Dhanvruddhisathi Mutual Fund By Arvind Paranjape (धनवृद्धिसाठी म्युच्युअल फंड)
Dhanvruddhisathi Mutual Fund By Arvind Paranjape (धनवृद्धिसाठी म्युच्युअल फंड)
Couldn't load pickup availability
वाचकाने परतपरत वाचावे असे हे पुस्तक आहे. सर्वांना समजेल अशा भाषेतील हे पुस्तक घरातल्या सगळ्यांनी वाचावे आणि संदर्भ म्हणून संग्रही असावे.
– दीपक घैसास
सुप्रसिद्ध उद्योजक
आर्थिक स्वातंत्र्य असले तर मनाजोगत्या गोष्टी करता येतात आणि सातत्य ठेवून गुंतवणूक केली तर ते मिळवणे प्रत्येकाला शय आहे. त्यासाठी लागणारे अर्थनियोजन कसे करावे आणि म्युच्युअल फंडाचे सोपे; तरीही परिणामकारक साधन वापरून आपली आर्थिक स्वप्नं कशी साकार करावीत, हे या पुस्तकातून समजते. बहुविध गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या तज्ज्ञ लेखकाने सोप्या भाषेतून लिहिलेले हे पुस्तक गुंतवणुकीचा वाटाड्या बनून तुमची वाट सुकर करेल.
आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याकरता म्युच्युअल फंडाचे तंत्र कसे समजून घ्यावे आणि प्रगतिपथावरील भारतीय अर्थव्यवस्थेच्या साहाय्याने सर्व वयाच्या गुंतवणूकदारांनी धनवृद्धी कशी करावी, हे संवादातून समजावणारे पुस्तक!
अरविंद शं. परांजपे
बी.एस्सी., एफ.सी.एम.ए., ए.सी.एस.
अरविंद परांजपे हे सार्थ वेल्थ प्रा. लि. या म्युच्युअल फंड वितरण करणार्या कंपनीचे संचालक असून त्यांना अर्थक्षेत्रातला चाळीस वर्षांचा अनुभव आहे. पर्सनल फायनान्स या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे आणि व्याख्यानेही दिली आहेत.
Share
