Denar Jhad By Sada Dumbare (देणारं झाड)
Denar Jhad By Sada Dumbare (देणारं झाड)
Couldn't load pickup availability
समकालीन समाजाची वैचारिक, भावनिक स्पंदनं अधोरेखित करण्याचं काम पत्रकार करत असतात. घटनांचे अर्थ लावत असतात, विश्लेषण करत असतात, आपल्या विचारव्यूहाशी साधर्म्य असणाऱ्या समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींशी नाळ जोडून ते आपलं श्रेयस प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात.पत्रकार म्हणून किंवा संपादक म्हणून मला जो अवकाश प्राप्त झाला, त्यात मीही अशा व्यक्तींचा शोध घेत गेलो. त्या शोधात मला अनेक माणसं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटली. या माणसांनी मला किती आनंद दिला,माझं जीवन अर्थपूर्ण केलं. या आनंदाचा ठेवा म्हणजे हे पुस्तक.-सदा डुम्बरेदेणारं झाडभूमी : गरीब लोकांचं श्रीमंत गाव । रानडेतले दिवसमूळ : गोपाळ कृष्ण गोखले । विठ्ठल रामजी शिंदे । नानासाहेब परुळेकरखोड : प्रभाकर पाध्ये । श्री. ग. मुणगेकर । एस. के. कुलकर्णी । पु. ल. देशपांडे अरुण टिकेकर । देवदत्त दाभोलकर । म. द. हातकणंगलेकर एम. एस. सुब्बलक्ष्मी । लीलाताई पाटील । विष्णू चिंचाळकर गुरुजी दया पवार । रा. प. नेने । जोसेफ ॲलन स्टेनशाखा : अनिल आगरवाल । अनिरुद्ध कुलकर्णी । डॉ. अभय बंग मल्लिका साराभाई । ओरिआना फल्लाचीगेल्या तीस-चाळीस वर्षांच्या काळात ज्या पत्रकार संपादकांनी सकल सामाजिक दृष्टी ठेवून पत्रकारिता केली, त्यातलं एक नाव म्हणजे सदा डुम्बरे. एकारलेपण नाकारून विविध बिंदूंना जोडून पाहण्याच्या वृत्तीने डुम्बरे पत्रकारितेत कार्यरत राहिले. त्यातून त्यांनी अफाट मित्रसंग्रह जोडला. या पत्रकारी प्रवासात त्यांना महत्त्वाच्या वाटलेल्या निवडक माणसांवर प्रेमाने, आदराने आणि अचंब्याने लिहिलेल्या लेखांचा संग्रह.
Share
