Skip to product information
1 of 1

Deadshot By Suhas Shirvalkar (डेडशॉट)

Deadshot By Suhas Shirvalkar (डेडशॉट)

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

मुंबई- एक गतिमान जीवन. येणारा क्षण गेल्यानंतर कळतो. सगळंच वेगवान. शहराशहरांचा गुण एकेक. पुण्यातला पाऊससुद्धा आळसटल्यासारखा पडेल. मुंबईचा पाऊस म्हणजे बॉक्सिंग चॅम्पियनसारखा. आला आला म्हणेपर्यंत केव्हाच तीस-चाळीस टप्पोरे थेंब तुमच्या शरीरावर थडाथड बसतील ! 'पावसाची रिमझिम' हा प्रकार मुंबईत विरळाच. म्हणूनच रिमझिम पावसाचं रूपांतर धो-धो पावसात झालं तरी फिरोजला आश्चर्य वाटलं नाही. त्याच्या केक खाण्यावर त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. कोसळणाऱ्या धारांकडे पहात तो चवीनं केकची डिश फस्त करत बसला होता. ओल्याचिंब शरीरानं तिनं हॉटेलात प्रवेश केला तरी फिरोजचं लक्षही नव्हतं. तिचं ओलं सौंदर्य मुक्त नजरेनं टिपण्याचं भाग्य फक्त हॉटेलचे वेटर्स आणि काउन्टरवर असलेल्या कॅशिअरलाच लाभलं होतं. क्षणभर ती दारातच थबकली. हॉटेलच्या आतल्या भागावरून नजर फिरवताना तिच्या डोळ्यांतला आनंद लपला

View full details