Skip to product information
1 of 2

Dakshin Parv By Snehlata Swami (दक्षिण पर्व)

Dakshin Parv By Snehlata Swami (दक्षिण पर्व)

Regular price Rs. 234.00
Regular price Rs. 275.00 Sale price Rs. 234.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

छत्रपती शिवराय यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली ती शहाजीराजे यांनी मुद्रा, ध्वज व प्रधानमंडळ देऊन बंगलोरहून पुणे जहागिरी सांभाळण्यास पाठविले. तेव्हापासून आणि प्रतिपदेचा चंद्र कलेकलेने वाढत जावा, तसे हे स्वराज्य दिल्लीच्या तख्तावर अत्यंत क्रूर औरंगजेब बादशहा असताना वाढत गेले, हे विशेष. त्यातही विशेष म्हणजे, बंगलोरहून निघालेले बाल शिवाजी आणि स्वराज्य स्थापून छत्रपती म्हणून पुन्हा दक्षिणेत स्वराज्यविस्तार मोहीम हाती घेणारे छत्रपती ही साधी गोष्ट नव्हे, तर स्वप्नपूर्ती आहे. एक चक्र, प्रदक्षिणा पूर्ण झाल्याचे संकेत होय. त्यामुळे ही कादंबरी स्वराज्यस्थापनेबरोबर स्वराज्यविस्ताराचा आणि छत्रपतींच्या सुशासनाचा मागोवा घेत दक्षिण मोहिमेचा प्रवास घडविते. त्यातही छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेत पुढे सरकते, त्यामुळे शिवाजीराजेंच्या विचारांची उंची व खोलीही वाचकास अनुभवता येते. दक्षिण मोहीम ही छत्रपतींची सर्वात मोठी दीर्घ मोहीम होती आणि या एक-दीड वर्षाच्या स्वारीने तत्कालीन स्वराज्यापेक्षा दुप्पट प्रदेश हस्तगत झाला. 'युद्ध' हा राजनीतीतील शेवटचा उपाय असावा असे म्हटले जाते, त्याप्रमाणे कोठेही फारसे युद्ध न करता मुत्सद्देगिरीने जिंकलेला हा प्रदेश. एवढेच नव्हे, तर या प्रदेशामुळेच मराठी राज्य टिकले आणि याच राज्याने पुढे अटकेपार मराठी झेंडा फडकाविला. त्यामुळे या मोहिमेचे हे महत्त्व लक्षात घेता ही कादंबरी आपली मुद्रा उमटविणारी ठरते, यात शंका नाही.

View full details