Dabholkarhatya Aani Mi By Vikram Bhave (दाभोळकरहत्या आणि मी)
Dabholkarhatya Aani Mi By Vikram Bhave (दाभोळकरहत्या आणि मी)
Couldn't load pickup availability
२० ऑगस्ट २०१३ या दिवशी पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली. (असे पोलिसांचे म्हणणे आहे.) त्यानंतर अर्धा घंट्याच्या आतच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असे विधान केले, ‘गांधी हत्या करणारी शक्तीच नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या मागे आहे.’ हे विधान करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अन्वेषणाची दिशा आधीच ठरवून दिली. त्यामुळे दाभोलकरांच्या हत्येचे अन्वेषण कोणत्या दिशेने होणार, हे निश्चित झाले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाणांनी ‘दाभोलकर हत्येबद्दल माहिती देणार्याला १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल’, अशीही घोषणा केली. पृथ्वीराज चव्हाणांची ही दोन्ही विधाने काही घंट्यांच्या अंतराने केलेली आहेत. ही दोन्ही विधाने, म्हणजे हिंदुत्वनिष्ठांना दाभोलकर हत्येच्या खुनाच्या प्रकरणात गोवण्याच्या कटाचा पहिला टप्पा तर नसेल ? कारण जगभरात असा शिष्टाचार आहे की, कुठलाही खून झाला की, पोलीस त्या खुनाचे अन्वेषण करतांना सर्वप्रथम भाऊबंधकी, मालमत्तेचा वाद, पैशाचा व्यवहार, ‘बाईची’ भानगड, खंडणीसाठी अपहरण, अंडरवर्ल्डचा संबंध, विचारसरणी, अशा सगळ्या शक्यतांचे अन्वेषण करतात. भारतातही तसेच होते (असे म्हणूया); पण दाभोलकरांची हत्या होऊन अर्धा-एक घंटाही झाला नाही, तोच राज्याच्या मुख्यमंत्र्याने उघडपणे हिंदुत्वनिष्ठांवर संशय घेणे आणि १० लाखांचे बक्षीसही घोषित करणे, हे सगळेच संशयास्पद नाही का ?
Share
