Cyber Palakatva - Bhag 2 : Digital Jagnyacha 'Unfiltered' Satya By Mukta Chaitanya ( सायबर पालकत्व भाग २ )
Cyber Palakatva - Bhag 2 : Digital Jagnyacha 'Unfiltered' Satya By Mukta Chaitanya ( सायबर पालकत्व भाग २ )
Couldn't load pickup availability
'काही करायला नाही म्हणून मोबाईल घेऊन बसतो.'
'मला कुठलं मोटिव्हेशनचं नाही. म्हणून मोबाईलवर रील्स बघत असते.'
मुलीला नव्याने मोबाईल दिला, आता तिचं वागणं फारच बदललं आहे, हे सांगणारी आई आणि स्वतःचे अनुभव सांगणारी मुलंमुली अशा अनेक उदाहरणांविषयी शिवाय ऑनलाईन जगात काय चालतं याविषयी साद्यंत माहिती देणारं पुस्तक म्हणजे सायबर पालकत्व.
आपण डिजिटल पालकत्वाच्या काळात जगतो आहोत. आपल्या समोरची आव्हाने अधिक जटील आणि गुंतागुंतीची आहेत. अशावेळी आपण स्वतःला सक्षम बनवणं आवश्यक आहे. आताच्या काळात मोबाईल, इंटरनेट यांच्या वापराशिवाय राहणं शक्य नाही आणि तसं राहूही नये. म्हणूनच सायबर पालकत्व हा पर्याय नाही, तर आजच्या काळाची गरज आहे. सायबर पालकत्वाचा विचार मूल जन्माला घालण्याच्या आधीपासून केला गेला पाहिजे. म्हणूनच, हे पुस्तक लिहिताना केवळ मार्गदर्शन करणं हा हेतू नाहीये तर, सायबर पालकत्वाचा प्रवास करताना कधी मदत करणं, कधी आरसा दाखवणं, कधी हात घट्ट पकडून पुढे जायला मदत करण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच मुलांचं पालकत्व करणाऱ्या समाजातील प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयोगी आहे.
Share
