Corporate Gandhi Narayan Murti By Rahul Singhal (कार्पोरेट गांधी नारायण मूर्ती)
Corporate Gandhi Narayan Murti By Rahul Singhal (कार्पोरेट गांधी नारायण मूर्ती)
Couldn't load pickup availability
नारायण मूर्ती : एक प्रेरणादायी व्यक्तितत्त्व. उद्योग व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सॉफटवेअर उद्योगाची त्यांनी या देशात मुहूर्तमेढ रोवली. देशातील बहुतेक उद्योजक जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेला विरोध करीत असताना मूर्ती यांनी जागतिकीकरणाचा आपल्या उद्योगाच्या भरभराटीसाठी उपयोग करून घेतला.
एक व्यक्ती म्हणूनही मूर्ती यांचे जीवन प्रेरणादायी आहे. डोक्याने उद्योजक आणि हृदयाने समाजवादी असलेल्या मूर्ती यांनी आपल्या उद्योगातील कर्मचार्यांना भागधारक होण्याची संधी उपलब्ध करून दिली. आपल्या वैयक्तिक संपत्तीचा जास्तीत जास्त वाटा समाजासाठी, विद्यार्थी आणि गोरगरिबांच्या विकासासाठी खर्च करून मूर्ती यांनी वेगळा आदर्श घालून दिला आहे.
यशस्वी उद्योजक आणि करोडो रूपयांच्या संपत्तीचा मालक बनल्यानंतरही मूर्ती यांनी साधी राहण सोडली नाही. समाजकारणात महात्मा गांधीनी घालून दिलेले आदर्श औद्योगिक जीवनात जपले.
तरुणांना दिशो देणारे विचार समजून घेण्यासाठी मूर्ती यांचे चरित्र मुळातूनच वाचायला हवे.
Share
