Skip to product information
1 of 1

Kashmir Ek Shapit Nandanwan Sankshipt Awrutti By Sheshrao More

Kashmir Ek Shapit Nandanwan Sankshipt Awrutti By Sheshrao More

Regular price Rs. 239.00
Regular price Rs. 280.00 Sale price Rs. 239.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Condition
Publication
Language

'काश्मीर :एक शापित नंदनवन याच नावाच्या १९९५ साली प्रसिद्घ झालेल्या ग्रंथाची ही संक्षिप्त आवृती. ग्रंथ संक्षिप्त केलेला असला तरी काश्मीर-समस्या मात्र वाढलेली आहे; अधिकच गंभीर, स्फोटक बनलेली आहे! या ग्रंथाचा हेतू काश्मीर-प्रश्न मुळात काय आहे व तो का सुटत नाही, याचे सत्यकथन हा आहे.  तेथील महाराजांना भारतात विलीन व्हावयाचे नव्हते, हा प्रवाद खरा आहे काय?  त्यांना पाकिस्तानात विलीन होण्याचा सल्ला भारताने का दिला होता?  संस्थानांच्या विलीकरणाचे भारताचे धोरण कोणते होते?  विलीन करून घेताना सार्ताचे लेखी आकश्र्वासन का देण्यात आले?  तरीही नंतर सार्वमत का घेतले गेले नाही?  घटनेत ३७० कलम कसे व कशासाठी आले?  पं. नेहरूंनी पंतप्रधान शेख अब्दुल्लांना कारागृहात का टाकले?  तेथे अराजकाची व दहशतवादाची सुरूवात केव्हा झाली? या व अशा अनेक प्रश्नांची खरी उत्तरे या ग्रंथात सापडतील. भरभक्कम पुराव्यांनिशी यात मांडलेले दाहक सत्य कितीही अप्रिय वाटले तरी राष्ट्रासाठी ते समजून घ्यावेच लागेल. कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नाच्या ख-या स्वरूपाचे अज्ञान हाच मूलत: एक राष्ट्रीय शाप आहे. म्हणूनच काश्मीर हे ‘शापित नंदनवन’ ठरले आहे! 

View full details