Combo set ( The Hidden life of Trees By Peter Wohlleben + Bandhavarachi Zade By Dr. V. N. Shinde )
Combo set ( The Hidden life of Trees By Peter Wohlleben + Bandhavarachi Zade By Dr. V. N. Shinde )
Couldn't load pickup availability
द हिडन लाईफ ऑफ ट्रीज | पीटर वोह्लेबेन -
अद्ययावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलांच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात याचा उलगडा वाचकांना सहज होतो.
पथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतींचे जीवन हे मानवी. कुटुंबरचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे पीटर वोह्ललेबेन ‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ या पुस्तकातून दाखवतात. जंगलातील झाडे आपल्या पिलांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, पोषणद्रव्ये पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात, आजारपणात शुश्रूषा करतात आणि धोक्यांची पूर्वसूचनाही देतात.
अशा सहजीवनात वाढणार्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायू लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणार्या झाडाचे जीवन मात्र खडतर असते. जंगलात राहणार्या आपल्या स्वजातीयांपेक्षा त्यांचे आयुष्यही कमी असते.
जगभरात लोकप्रिय झालेल्या या पुस्तकात वोह्ललेबेन यांचे जंगल आणि वनस्पतींवरचे अपार प्रेम स्पष्ट दिसते. या पुस्तकातून सामान्य वाचकाला झाडांच्या जीवनचक्राची ओळख होते. ही जाणीव झाल्यावर जंगलातून हिंडताना आपल्याला एक वेगळाच अनुभव मिळेल, हे निश्चित.
बांधावरची झाडे | डॉ. व्ही. एन. शिंदे-
बोर, हादगा, जांभूळ, शेवगा, चिंच, आंबा, आवळा, कडुलिंब, बाभूळ,साग या झाडांविषयीच्या ज्ञानललित माहितीचा लेखसंग्रह म्हणजे ‘बांधावरची झाडे' हे पुस्तक.डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी जाणीवपूर्वक घडविलेला हा विज्ञानललित बंध आहे. झाडांच्या शास्त्रीय माहितीबरोबर त्यांचा व्याप्ती-पसारा, भूगोल, भाषिक संज्ञेचा वर्णपट त्यामध्ये निवेदिला आहे. त्यामुळे त्यास वस्तुनिष्ठ वैज्ञानिक माहितीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यासाठी त्यांनी विविध ज्ञानशाखांमधील माहितीचा भरगच्च आधार घेतला आहे. झाडांचा अधिवास व परिसर विज्ञानाविषयीचे हे कथन आहे. त्यात शेतीज्ञानाबरोबर वनस्पतिविज्ञान आहे. त्या त्या झाडांची व्यावहारिक उपयोगिता सांगितली आहे. शिंदे यांच्या लेखनाचा महत्त्वपूर्ण विशेष म्हणजे झाडसृष्टीच्या मानवनिर्मित बांधकामाचे कथन. माणूस आपल्या कल्पनानिरीक्षणाने सृष्टिवाचन करत त्यास मानवी रंगरूप देत आला आहे. डॉ. शिंदे यांच्या लेखनात मानवाने आदिकाळापासून झाडांविषयीचे रचलेले विहंगदर्शन आहे. लोककथा, गाणी, दंतकथा, मिथके व आधुनिक साहित्यातील ही झाडदर्शने आहेत. लोक व लिखित परंपरेच्या झाडवाचनाचा त्यात धांडोळा आहे. एका अर्थाने मराठी संस्कृतीत उमटलेले झाडांचे हे बिलोरी रंगछायादर्शन आहे. डॉ. शिंदे यांच्या या झाडवाचनाला लेखकाच्या आत्मपरतेचे गहिरे रंग प्राप्त झाले आहेत. त्यामुळेबांधावरील हे झाडमायादर्शन मनोहारी ठरेल.
- डॉ. रणधीर शिंदे
Share
