Skip to product information
1 of 9

Combo set of Informative books By Achyut Godbole (9 books) - (माहितीपर पुस्तकांचा संच - लेखक |अच्युत गोडबोले )

Combo set of Informative books By Achyut Godbole (9 books) - (माहितीपर पुस्तकांचा संच - लेखक |अच्युत गोडबोले )

Regular price Rs. 2,631.00
Regular price Rs. 3,095.00 Sale price Rs. 2,631.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

1) ( गुन्ह्याच्या पाऊलखुणा- गुन्ह्यांपासून अटकेपर्यंत : फॉरेन्सिक सायन्स/ सायकॉलॉजी याची रंजक कहाणी | लेखक - अच्युत गोडबोले, परेश चिटणीस ) - 299/-
पाने - 304


गुन्हेगार कितीही शहाणा असला तरी विज्ञान त्याला पकडणारच! 👣

🕵️ रक्ताचे थेंब, बोटांचे ठसे, डीएनए पुरावे – हे छोटे तपशील मोठे रहस्य उलगडतात!
या पुस्तकात वाचा फॉरेन्सिक सायन्सच्या मदतीने सोडवलेल्या काही जबरदस्त क्रिमिनल केसेस!

📖 वास्तवावर आधारित, बुद्धीला चालना देणारे रहस्य!

2) (बिग बँग - विश्वप्रारंभाचे थरारनाट्य)- - 299/-
लेखक - अच्युत गोडबोले, दुष्यंत पाटील
पाने - 344

या अथांग विश्वाचा प्रारंभ कसा झाला ?
विश्वाच्या प्रारंभाचा शोध घेण्याचं वेड शास्त्रज्ञांना कसं लागलं ?
विश्वाच्या प्रारंभाचे पुरावे माणसानं कसे शोधले ?

या पुस्तकात उलगडेल विश्वप्रारंभाची शोधकथा..

थक्क करणारा विश्वप्रारंभाचा थरार आणि त्याचा शोध घेताना शास्त्रज्ञांनी केलेली अचंबित करणारी धडपड जाणण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा !

3) डिप्रेशन | लेखक - अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे - 299/-
पाने - २६०

नैराश्य हा सध्याच्या काळातील एक महत्त्वाचा आणि अनेक लोकांना भेडसावणारा विषय आहे. लेखकांनी या विषयावर अतिशय सखोल अभ्यास करून, त्याच्या इतिहासापासून ते जागतिकीकरणामुळे त्याच्यावर झालेल्या परिणामांपर्यंत सर्व पैलू समजावून सांगितले आहेत. अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी हा अवघड विषय सामान्य वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडला आहे, ज्यामुळे हे पुस्तक खरोच कौतुकास्पद ठरते.

4) लाईमलाईट प्रादेशिक | लेखक: अच्युत गोडबोले, सतीश कुलकर्णी - 299/-
पाने - ३४४
(२५ प्रादेशिक चित्रपटाबद्धल सविस्तर माहिती )
____________________________________________________
अभिप्राय :

1)
 अच्युत गोडबोले याला देवानं काय अवतार घेऊन पृथ्वीवर पाठवलाय, हे देवाला तरी आठवतंय का... असा प्रश्न मी हे पुस्तक वाचताना स्वत:लाच कितीदा विचारला, हे मलाही आठवत नाही.
साधारण एका जन्मात, एक अत्यंत हुशार माणूस किती विषय अभ्यासू शकतो?  किती पदव्या मिळवू शकतो? आणि किती विषयांत १०० टक्के मार्क मिळवू शकतो? या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ज्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही, त्या विषयाला हात घालून, त्याचा अधाश्यासारखा अभ्यास करून, त्याचा रसास्वाद घेणं; आणि ते लिहून काढून, लोकांना त्याचा आनंद मिळावा म्हणून पुस्तकरूपात ते उपलब्ध करून देण्याचा चमत्कार हा माणूस किती वर्षं करतोय, हेही आता आठवेनासं झालंय! 
आत्ताच अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी यांनी लिहिलेलं नवीन पुस्तक क्लासिकमध्ये मोडणाऱ्या चित्रपटांचं परीक्षण... नाही समीक्षण... नाही रसग्रहण... नाही रसपानग्रहण... नाही....
मला तर शब्दच सुचत नाहीये असं लिहिलंय हे!
एक अभिनेत्री म्हणून एवढंच सांगते की, सिनेमा माध्यमाचा एवढा सखोल अभ्यास आणि विचार करून सिनेमा बनवणारी मंडळीसुद्धा हे पुस्तक वाचून काहीतरी नवीन शिकतील, असं मनात आलं. त्या-त्या फिल्ममेकरचा मोठेपणा नेमका टिपून आपल्यापर्यंत पोहोचवलाय.
एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक दिल्याबद्दल अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी ह्यांची मी सदैव ऋणी आहे! 
वंदना गुप्ते

5) झपूर्झा ४ (भारतीय)। लेखक - अच्युत गोडबोले, वर्षा दौंड - 350/-
पाने - ४००

आपला भारत अनेक प्रज्ञावंत, साहित्यिक, तत्त्वज्ञ, संशोधक, संत आणि विचारवंत यांचा देश आहे. विशेषत: महाराष्ट्र हा मराठी साहित्याने सुसंपन्न आहे. मराठीतले अनेक साहित्यिक आपणाला परिचित आहेत. अण्णाभाऊ साठे, पू. भा. भावे, पु. ल. देशपांडे, जी. ए. कुलकर्णी, प्र. के. अत्रे, वि. वा. शिरवाडकर ही आणि अशी अनेक नावं आपल्या ओठांवर सहजगत्या येतात, अगदी त्यांच्या टोपणनावासकट! पण आपल्याच देशातल्या मराठीव्यतिरिक्त साहित्यिकांची यादी तितकीशी आपल्याला तोंडपाठ नसते, म्हणजे फार परिचित नाहीत! खरंतर त्यांचंही साहित्यातलं योगदान अत्यंत मोलाचं आहे. त्यांचाही साहित्यिक प्रवास जाणून घ्यावा, म्हणून हा एक प्रयत्न!
झपूर्झा-४ (भारतीय) घेऊन आलंय २० उत्तम साहित्यिक आपल्याचसाठी! 

6) पाणी । लेखक- अच्युत गोडबोले, अविनाश सरदेसाई 
पाने - ४९६ - 499/-

माणसाच्या जीवनाला व्यापणारे दोन विषय म्हणजे हवा आणि पाणी! या दोन्हींशिवाय माणूस क्षणभरही जगू शकत नाही. पंचमहाभूतांपैकी पाणी या भुतानं माणसाला कसं झपाटलं आहे, याची रंजक गोष्ट म्हणजे हे पुस्तक! या पुस्तकात पाण्याचा विज्ञान, इतिहास, संस्कृती, कला आणि दैनंदिन जीवनाशी असलेला अद्भुत संबंध रोचक व माहितीपूर्ण पद्धतीनं मांडला आहे. 
पाण्याविषयीच्या पाश्चात्त्य आणि भारतीय कल्पना, नद्या आणि हिमनद्या, समुद्र आणि समुद्री जीव, मान्सून आणि हवामान, शरीर आणि अंघोळ, खाद्यपदार्थ, जलवाहतूक, जलरंग, अंघोळ न केलेल्या माणसाची गोष्ट, पाण्यानं रोग बरे करण्याची विचित्र पद्धत, पाण्यावरची वाद्यं आणि यंत्रं, पृथ्वीवरचं आणि इतर ग्रहांवरचं पाणी, पाण्याचं व्यवस्थापन आणि प्रदूषण... आणि अर्थात, या सगळ्यांमधलं विज्ञान; अशा सर्व विषयांची असलेली अद्भुत गुंफण म्हणजे हे पुस्तक!

7) क्रिमिनल सायकॉलॉजी । लेखक - अच्युत गोडबोले, परेश चिटणीस 
पाने - २८०- 350/-

गुन्हा घडतो तेव्हा तो लगेच सगळ्यांच्या नजरेत येतो. वृत्तपत्रात आणि चॅनेल वर बातम्या भरून जातात, लोक चर्चा करतात, आरोपीचे चेहरे झळकतात. पण त्या गुन्ह्याच्या आधी जे काही मनात घडत असतं, ते कुणाच्याच लक्षात येत नाही.
‘गुन्हेगारी मानसशास्त्र’ या पुस्तकात त्या अदृश्य जगाची दारं उघडली आहेत. प्रत्येक कथा एका खऱ्या गुन्ह्याने सुरू होते, पण ती संपते एका मानवी मनाच्या शोधात. मत्सर, लोभ, अपमान, एकाकीपणा, भीती, विकृती;  माणसाच्या आत दडलेली ही सगळी बीजं गुन्ह्याच्या रूपात कशी बदलतात, हे या कथा शांतपणे सांगतात.
जॅक द रिपरच्या काळोख्या लंडनच्या गल्लीपासून ते मुंबईतील रामन राघवच्या झोपडपट्ट्यांपर्यंत, ऑटो शंकरच्या मद्रासमधल्या राजकीय-सामाजिक जाळ्यापासून ते बिहारच्या अमरजीत सदा या लहान खुनी मुलाच्या निरागस पण थंड मनापर्यंत — प्रत्येक कहाणी मन हादरवते.
सुरिंदर कोलीच्या क्रूरतेतून समाजाचं मौन दिसतं, अंद्री चीकातीलोच्या रशियातल्या हत्यांमधून एका तुटलेल्या युगाची निराशा, क्रिस्टा पाइकच्या तरुण मनातून सूडाचं विकृत सौंदर्य, तर जोशी-अभ्यंकर आणि रंगा-बिल्लाच्या भारतीय प्रकरणांतून शहरी गुन्हेगारीचं नागवं रूप समोर येतं. या आणि अश्या तीस गुन्हेगारी प्रकरणांनी हे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवतं.

8) सायबर सिक्युरिटी | लेखक - अच्युत गोडबोले, डॉ. अमेय पांगारकर
पाने - २६४ -350/-

'सायबर सिक्युरिटी' म्हणजे फक्त संगणक प्रोग्रामर किंवा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांचं काम नाही. ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण डिजिटल जग हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. या पुस्तकात आपण सायबर सिक्युरिटीचा इतिहास, सायबर सिक्युरिटीशी निगडित महत्त्वाच्या संज्ञा, आजच्या डिजिटल युगात सायबर सिक्युरिटीचं महत्त्व, आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठीचे उपाय आणि भविष्यातली जागरूकता याबद्दल सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्याबरोबरच तुम्हांला सायबर हल्ल्यांचे विविध प्रकार समजतील. फिशिंग, हॅकिंग, ओळख चोरी, डिजिटल अरेस्ट, UPI आणि ई-कॉमर्स फसवणूक, डीपफेक, जॉब स्कॅम्स आणि अजून बरंच काही ! प्रत्येक प्रकरण सोप्या उदाहरणांसह लिहिल्यामुळे वाचक फक्त माहितीच मिळवणार नाहीत, तर ते आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष वापरू शकतील असे उपाय घेऊन जातील.

श्री. कैलाश काटकर
चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, क्विकहील टेक्नॉलॉजी लिमिटेड

9) नशा (जगाला विळखा घालणारी महामारी )। लेखक - अच्युत गोडबोले, सुधीर फाकटकर 
पाने - २६४ 

"नशाऽऽऽ" मानवी वाटचालीत कधीपासून, कशी आली?... आदिमानव काळापासून?.. कळत-नकळत की जाणिवपूर्वक?... जगभरात विविध टप्प्यांवर मानवी संस्कृती विकसीत होत असताना नशेचे कितीतरी घटकही उत्क्रांत होत गेले. 'नशा' कुठून कुठपर्यंत बदलत गेली?... आणि बदलत चालली आहे?...

आजच्या कालखंडात, एकविसाव्या शतकातून पुढे जाताना, अधिकाधीक प्रगत आणि सुज होत असलेल्या मानवी संस्कृतीत, तंबाकू-दारूपासून आधुनिक काळातील नवनवीन ड्रग्जचा पृथ्वीतलावरील इतिहास-भूगोलाचा आढावा घेत, नशा-व्यसनांच्या अनुषंगाने आरोग्याचे ज्ञान-विज्ञान जाणून घेत तसेच नशा-व्यसनांच्या समाजकारण-अर्थकारण-राजकारणाचे व्याकरण मांडत आणि महत्वाचे म्हणजे जगाला विळखा घालत विनाशाकडे घेऊन चाललेल्या नशेच्या महामारीचा मनःपूर्वक आस्थेने मांडलेला हा लेखाजोगा....... माणसाच्या, मानवतेच्या पुढील शाश्वत वाटचालीसाठी .......

View full details