1
/
of
1
Chitrakhyan By Prof. Dr. Pankaj Vishwas Bhamburkar (चित्राख्यान)
Chitrakhyan By Prof. Dr. Pankaj Vishwas Bhamburkar (चित्राख्यान)
Regular price
Rs. 459.00
Regular price
Rs. 540.00
Sale price
Rs. 459.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
चित्राख्यान
प्रा. डॉ. पंकज भांबुरकरांच्या लेखनाला संस्कृत भाषेतील सौंदर्य-स्थळांचा आणि भारतीय संस्कृतीतील विलोभनीय दृष्टांतांचा भक्कम आधार आहे. त्यांच्या लेखनात भाषेचे प्रसवणे आहे आणि प्रचुरताही आहे, त्यामुळेच त्यांचे लिखित विचार एखाद्या विषयाला व्यापक रूप देत असताना गहन पातळीवरही नेतात. म्हणूनच ते स्वतःच्या कलाविषयक अभिव्यक्तीला केवळ शब्दरूप देत नाहीत, तर त्यातील आशयाचा तर्कनिष्ठ पाठलाग करत त्याच्या मूलस्रोतापर्यंत जाताना स्वतःसोबत वाचकालाही घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात.त्यांचे लेखन कलेविषयक उद्बोधक माहिती तर देतेच; परंतु कलेच्या मुळाशी स्पंदत असणार्या अज्ञात वैचारिक श्वासाबाबत आणि त्याला प्रवाहित ठेवणार्या विविध प्रक्रियांबाबत ते जागे करून वाचकाला कलेतील दृश्य अनुभवाच्या आस्वादात गुंतवतात.
Share
