Chikupiku February 2025 -( चिकूपिकू फेब्रुवारी २०२५)
Chikupiku February 2025 -( चिकूपिकू फेब्रुवारी २०२५)
Couldn't load pickup availability
या महिन्यात चिकूपिकूचा सहावा वाढदिवस! वाढत्या वर्षांबरोबर चिकूपिकूचं कुटुंबसुद्धा वाढतंय. मुलांना दर्जेदार आणि चांगलं साहित्य वाचायला, ऐकायला मिळावं, त्यांची उत्सुकता, कल्पनाशक्ती वाढावी, जाणिवा समृद्ध व्हाव्या आणि पालकांनाही या प्रवासात एका मित्रासारखी चिकूपिकूची मदत व्हावी असा आम्ही नेहेमीच प्रयत्न करत राहू. तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि सूचना, अभिप्राय आमच्यापर्यंत पोचतात. असंच प्रेम कायम मिळत राहो हीच इच्छा.
या खास अंकासाठी उलटा-पुलटा प्रयोग आम्ही केला आहे. अर्धा अंक पुढून वाचा आणि उरलेला अर्धा अंक मागून वाचायला सुरू करा. मुलांना तर असा हा उलट सुलट करून वाचायला लागणारा अंक खूप आवडेल. जादूच्या, मजेच्या, भाषेची गंमत असलेल्या गोष्टी आणि कविता आहेत आणि भरपूर कोडी, अॅक्टिव्हिटीजसुद्धा आहेत. मुलांबरोबर अंक वाचा, ऑडिओ गोष्टी ऐका आणि आवडल्या का हे नक्की आम्हाला कळवा.
Share
