Skip to product information
1 of 2

Chiku Piku February 26 (चिकू पिकू फेब्रुवारी 2026)

Chiku Piku February 26 (चिकू पिकू फेब्रुवारी 2026)

Regular price Rs. 94.00
Regular price Rs. 110.00 Sale price Rs. 94.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language version

कविता - विद्याधर शुक्ल | चित्र - मक्ती दलाल
वर्षे भुर्रकन उडून गेली एक दोन तीन चार पाच सहा सात
चिकू पिकू झाले किती मोठे भो भो किलबिल गाणे गात मित्र मैत्रिणी जमले सारे एक दोन तीन चार पाच सहा सात
हे गाणं ऐक.
गोफ गुंफला सात सुरांचा सर सर चढले वरती गात ढगात गेले गाता गाता एक दोन तीन चार पाच सहा सात
ढगावरुनी गेले सुळकन इंद्रधनुष्याच्या राज्यात गेले घसरत रंगावरूनी एक दोन तीन चार पाच सहा सात
गेले झुम झुई वरती भेटले सप्तर्षीचे तारे सात सात ऋषींनी भेट दिले मग चमचमणारे मुकुट सात
सूर्य भेटला, हसत बोलला यारे लवकर किरणरथात सारे बसले, दौडत गेले किरणरथाचे घोडे सात
शिडी किरणांची करुन उतरले एक दोन तीन चार पाच सहा सात फेर धरूनी नाचू लागले एक दोन तीन चार पाच सहा सात
रंगुनी सारे गात राहिले एक दोन तीन चार पाच सहा सात भो भो भो भो किलबिल किलबिल एक दोन तीन चार पाच सहा सात.

View full details