Chernobylchi Prarthana By Smita Limaye(Translators) चेर्नोबिलची प्रार्थना
Chernobylchi Prarthana By Smita Limaye(Translators) चेर्नोबिलची प्रार्थना
बेलारूससारख्या लहान देशासाठी ( फक्त १० दशलक्ष लोकसंख्या ) हा अपघात एक राष्ट्रीय दुर्घटना होती. कारण या देशात त्याचे स्वत:चे एकही अणुऊर्जा क्रेंद्र नव्हते. बेलारुस ही आजही एक कृषीप्रधान भूमी आहे, ज्यात बहुतांश जनता ग्रामीण आहे. दुसर्या जागतिक महायुध्दाच्या वेळी जर्मनांनी ६१९ खेडी त्यांच्या रहिवाशांसकट नष्ट केली. चेर्नोबिलनंतर या देशाने ४८५ खेडी आणि गावं गमावली, ज्यापैकी ७० खेडी जमिनीखाली गाडली गेली. महायुध्दाच्या वेळी चार बेलारूसियांपैकी एक मारला गेला होता. चेर्नोबिल अपघातात पाच जणांपैकी एक जण या प्रदूषित प्रदेशात मारला गेला. म्हणजे २.१ दशलक्ष लोक, ज्यांपैकी ७००,००० मुलं होती. इथली लोकसंख्या कमी होण्याचं मुख्य कारण किरणोत्सर्ग हे होतं. गोमेल आणि मॉगिल्योव्ह या परगण्यांसारख्या अधिक प्रभावित झालेल्या क्षेत्रात मृत्युदर हा जन्मदरापेक्षा २० टक्क्यांनी अधिक होता.