Chaturang Anvay + Ekata + Padmaratna Diwali Ank 2024 ( चतुरंग अन्वय + एकता + पद्यरत्न दिवाळी अंक २०२४)
Chaturang Anvay + Ekata + Padmaratna Diwali Ank 2024 ( चतुरंग अन्वय + एकता + पद्यरत्न दिवाळी अंक २०२४)
Couldn't load pickup availability
# चतुरंग अन्वय #
अंकाची तयारी सुरू असताना मराठी भाषेला 'अभिजात' 'माषेचा दर्जा मिळाल्याची सुवार्ता आली. गेली दहा वर्षे अनेकांनी अनेक प्रकाराने केलेल्या अखंड प्रयत्नांना यश आले. मराठी भाषेला प्राचीन आणि समृद्ध परंपरा आहे हे या निमित्ताने सिद्ध झाले, याचा आपणाला निश्नितच अभिमान वाटेल, पण आपली ही समृद्ध मराठी भविष्यातही 'ज्ञानभाषा' म्हणून विकसित करण्याधीही आपली जबाबदारी असणार आहे. त्यादृष्टीने कृतीशील होणे गरजेचे आहे. आणखीन एक अशी आनंद वार्ता म्हणजे आपणा सर्वांना आदरणीय असणाच्या डॉ. तारा भवाळकर यांची दिल्ली येथे होणाऱ्या आगामी ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून झालेली निवड ही होय.
# एकता #
एकताचा यंदाचा दिवाळी अंक अनेक वैविध्यपूर्ण लेखांनी समृद्ध झालेला आहे. वाचकांना वैचारिक समृद्धीचा बौद्धिक फरार अनुभवता यावा यादृष्टीने लेखांची निवड केली गेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दीकडे होणारी नटवाल ही मोठी ऐतिहासिक घटना आहे. एखादी अशी संघटना की, ज्यात ध्वज' ह गुरु मानला आतो आणि ज्या संघटनेसाठी व्यक्ती संपूर्ण आयुष्य प्रचारक म्हणून अर्पण करतात हेच किती विलक्षण आहे ? संघ स्थापन झला, तेव्हा सुरु आलेली ही पद्धत आजही कायम आहे.
# पद्यरत्न #
'पद्याल दीपावली'चा हा पाचवा अंका 'पद्यरत्न' म्हणजे काय? पद्या आणि रत्ना या आमच्या दोन बहिणीच्या नावाचे एकत्रिकरण। परिस्थिती मला माणदेशातून इचलकरंजीला घेऊन आली. शिक्षण अर्धवट राहिले; पण वाचन सुटले नाही. वाचन, चिंतन, मोजकेच लेखन करत राहिलो, दोनतीन वर्षे यंत्रमाग कामगार म्हणून काम केले. त्यानंतर यंत्रमागात तज्ज्ञ (जॉबर) म्हणून पन्नाशीपर्यंत सेवा बजाचली. दरम्यानच्या काळात मराठीतील तसेच इतर भाषेतील अनुवादित पुस्तके चाचत होतो आणि आताही बाचतोच आहे.
Share


