Chaprak + Naval +Chandrakant Diwali ank 2024 ( चपराक + नवल + चंद्रकांत दिवाळी अंक 2024 )
Chaprak + Naval +Chandrakant Diwali ank 2024 ( चपराक + नवल + चंद्रकांत दिवाळी अंक 2024 )
Couldn't load pickup availability
# चपराक #
जगातील अत्यंत प्रभावी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख काय? असा प्रश्न केला तर त्याचे एका शब्दात सांगता येण्यासारखे उत्तर म्हणजे 'देशभक्ती!' मुघलांच्या अनन्वित छळाने त्रस्त झालेले भारतीय पुढे ब्रिटिशांच्या जुलूमशाहीने हतबल झाले होते. या सगळ्या परिस्थितीचे चिंतन करून 'हिंदू संघटन' हे सूत्र घेत डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. या विजयादशमीला या अभूतपूर्व घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. शतकी वर्षात यशस्वी पाऊल ठेवलेल्या संघाने सामाजिक कार्याचा आणि अर्थातच राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य आविष्कार दाखवून दिला आहे
# नवल #
'हंस', 'मोहिनी' आणि 'नवल' हे यंदाचे दिवाळी अंक वाचकांच्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे आणि समाधानही वाटत आहे त्याचे कारण म्हणजे रूढ साहित्यिक प्रवाह आणि साहित्यिक मूल्ये जपत, सर्जनशील निर्मितीची आस असणाऱ्या नव्या दमाच्या लेखक-कवी-चित्रकारांना 'हंस' परिवारात समाविष्ट करून घेत, प्रकाशित होत असलेले या वर्षीचे दिवाळी अंकही 'हंस'च्या परंपरेला साजेसे असेच झाले आहेत.
# चंद्रकांत #
चंद्रकांत म्हणजे कादंबऱ्यांची मेजवानी हा लौकिक जपताना याही वर्षी चार दीर्घ आणि एक लघु अशा पाच कादंबऱ्या घेऊन आलो आहोत. प्रत्येक कादंबरीला आपला स्वतःचा वेगळा चेहरा आहे. विषयातील वैविध्य जपण्यासाठी लेखांचा समावेश व त्यातून होणारं विचारमंथनही आम्हाला महत्वाचं वाटतं. कलावंताची यशस्विता त्यांच्या जीवनप्रवासाद्वारे उलगडण्याची मुलाखतीची परंपरा या वर्षी सुद्धा राखलेली आहे. फ्रान्झ काफ्का या इंग्रजी लेखकाचं हे स्मृतिशताब्दी वर्ष आहे, जे जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरं केलं जात आहे. त्याच्या स्वभावानुरुप असलेल्या त्याच्या लेखन वैशिष्ट्याचा घेतलेला आढावा आणि त्याला आदरांजली म्हणून हेतुपूर्वक केलेल्या नवनवीन प्रयोगांची माहिती आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवून जाणारी आहे. चित्रपटसृष्टी सर्वांनाच अतिशय जवळची वाटते. त्यात महत्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि घटना याबद्दल माहितीपूर्ण लेख हे सुद्धा ह्या अंकाचं आकर्षण आहे.
Share


