Skip to product information
NaN of -Infinity

Chanakyaniti Chanakyasutransahit By Prashant Kulkarni ( चाणक्यनीती चाणक्यसूत्रांसहित - लेखक - प्रशांत कुलकर्णी )

Chanakyaniti Chanakyasutransahit By Prashant Kulkarni ( चाणक्यनीती चाणक्यसूत्रांसहित - लेखक - प्रशांत कुलकर्णी )

Regular price Rs. 199.00
Regular price Rs. 199.00 Sale price Rs. 199.00
Sold out
Shipping calculated at checkout.

           विष्णुगुप्त चाणक्यसारखे अनोखे व्यक्तीमत्व सहस्त्र वर्षातून  कधीतरी जन्माला येते. अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले  आर्य चाणक्य यांनी  आपल्या विद्वतेच्या व नीतिच्या जोरावर प्राचीन काळात अखंड भारताचे स्वप्न उरी बाळगले. चंद्रगुप्त मौर्यसारख्या हरहुन्नरी राजपुत्राची निवड करुन या स्वप्नाला मूर्त रुप दिले. चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात प्रधान पदी विराजमान असतानाही गवताच्या साध्या झोपडीत ते राहत असे. राज्याच्या  एखाद्या  गूढ समस्येवर उपाय शोधण्यासाठी काळ्याकुट्ट अंधारात स्वतःला कोंडून घेत असत.जेव्हा झोपडीचा दरवाजा उघडत असे तेव्हा जणू काही  काळ्याकुट्ट अंधारावर विजय मिळवणारा प्रकाशच बाहेर पडावा अशाप्रकारे  समस्येवरील रामबाण उपाय शोधूनच ते बाहेर येत .

               भारतवर्षात श्रीकृष्ण नीति,विदूर नीति नंतर प्रसिद्ध असलेली चाणक्य नीति आजच्या आधुनिक युगातसुद्धा मार्गदर्शक ठरते. चाणक्यनीतिचा सार हा  राजा,सेनानायक , राजकारणी व   उद्योजक  या क्षेत्रांसाठी उपयोगाचे आहेच; पण त्याबरोबरच एखादे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील तरुणांसाठीही तेवढेच उपयोगी ठरु शकते. विद्यार्थ्यांनी आपला आळस सोडून ज्ञानाचा ध्यास घ्यावा ! तरुणांनी व्यसन सोडून स्वतःला ओळखून जीवनाचे सोने करावे. आधुनिक जीवन जगताना  क्षेत्र कोणतेही असो यशस्वी जीवनाचा दीपस्तंभ म्हणून  चाणक्यनीति आजही दीपगृहासारखी मार्गदर्शक आहे.

View full details
Reviews
0.0
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
No reviews yet, lead the way and share your thoughts