Chalo Ek Bar Firase By Dr. Sudhir Joshi (चलो एक बार फिरसे)
Chalo Ek Bar Firase By Dr. Sudhir Joshi (चलो एक बार फिरसे)
Couldn't load pickup availability
सेहगलचा स्वत:चा आवडता राग म्हणजे बाराही स्वरांचा उपयोग करणारी
भैरवी! त्यांच्या मते ‘भैरवी जाणणे म्हणजे सर्व राग जाणणे! त्यांना स्वत:ला कविता
करण्याचा छंद होता. चित्रपटसृष्टीतील कामाच्या रेट्यातून उसंत मिळाली की ते
कविता करीत असत. जिक्र आणि रियाजामुळे त्यांचा आवाज अत्यंत सुरेल झाला
होता! तो इतका सुरेल होता की, त्यांना वीणा अथवा तानपुरा यासारख्या मूलवाद्यांची
गरज भासत नसे. असे म्हणतात की, त्यांच्या गुणगुणण्यानुसार संगीतकार वाद्ये
जमवून घेत असत. अशा सुरेल गायकाला रेडिओ सिलोन (श्रीलंका) ने सलग सुमारे
४५ वर्षे रोज सकाळी ७.५७ वा. त्यांचे एक गीत वाजवून अनोखी मानवंदना दिलेली
आहे. ‘मला संगीतातले फारच थोडे समजते’ अशी प्रामाणिक भावना बाळगणार्या
या कलावंतालाच खरे संगीत कळले होते. अध्यात्माप्रमाणे संगीतक्षेत्रातही ‘मला सर्व
कळले आहे’ असे म्हणणार्यांना काहीच कळलेले नसते; आणि ‘मला काहीच
कळलेले नाही’ असे म्हणणार्यांनाच सर्व काही कळलेले असते हेच खरे!
Share
