Chala Jag Jinku Ya By Dr. Santosh Kamerkar (चला जग जिंकू या)
Chala Jag Jinku Ya By Dr. Santosh Kamerkar (चला जग जिंकू या)
Couldn't load pickup availability
यशस्वी होण्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न, तळमळ, धडपड, योग्य नियोजन व श्रम मनुष्याला यशस्वितेकडे घेऊन जातात. अर्थात एखादे ध्येय साध्य करायचे ठरविले की त्या ध्येयाच्या दृष्टीने सतत कार्यरत राहण्यासाठी कुठून तरी प्रेरणा लाभावी लागते. अशी प्रेरणा आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र परिवार देतीलच याची शाश्वती देता येत नाही, परंतु प्रेरणादायी पुस्तके वारंवार वाचणे, त्यातील मुद्दे मनात ठसविणे यामुळे ध्येयप्राप्तीसाठी लागणारे मनोबल वा जिद्द मिळण्यास उपयुक्त ठरतात. चला जग जिंकू या ! या पुस्तकातूनही वाचकांना नवीन ज्ञान मिळणार आहे अशा पुस्तकांचे जाणीवपूर्वक वाचन केल्यास मानसिक आरोग्य चांगले राहते. म्हणूनच मी मला मोठं व्हायचंय! मला यशस्वी व्हायचंय! मला श्रीमंत व्हायचंय! मिशन कामयाबी यांसारख्या प्रेरणादायी पुस्तकांचे लिखाण केले आहे. आपल्यासारख्या वाचकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो हे माझ्यासाठी गौरवास्पद आहे, त्याबद्दल लाख लाख धन्यवाद !
Share
