Chal Ga Saye Warulala By Sanhita Rajan (चल गं सये वारुळाला)
Chal Ga Saye Warulala By Sanhita Rajan (चल गं सये वारुळाला)
Couldn't load pickup availability
संहिता राजन चा हा पहिला कथासंग्रह आहे. त्यातील वातावरणात मुख्यतः तीन घटक आपल्याला दिसतात. खानदानी मराठा कुटुंबातील स्त्रियांच्या जगण्यातील काळोख आणि घुसमट, माहिती - तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे तरुण - आणि प्राधान्याने तरुणींचे घोळके, आधुनिक शहरी जगातले मॉल्स व आनुषंगिक सांस्कृतिक दुनिया हे तिन्ही घटक संहिता च्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे त्या त्या वातावरणातील भाषा अगदी अस्सलपणे इथे आलेली आहे. जवळपास सारीकडे केंद्रस्थानी एक तरुण मुलगी आहे. कथा तिच्या भोवती फिरते. तिच्या नजरेतून सारे समोर येते. पण हे असे इतकेच नाही. माणसा-माणसांतील परस्पर संबंध, स्त्री पुरुष संबंध, परंपरा, धारणा आणि गतिक्रम यांच्याविषयीचे जे कुतूहल लिहिणाराला असावे लागते, ते इथे फार ठसठशीतपणे उपस्थित आहे. स्थळ-काळ, वातावरण, परिस्थिती या गोष्टी बदलतच असतात. त्यात मानवी संबंधांचे काय होते, याचे कुतूहल सनातन असते. परंपरेची सावली आणि नवी माहिती तंत्रज्ञानाची दुनिया यात आकार घेणारी संहिता ची कथा उत्कट, स्फुरणशील आणि अंगावर येणारी आहे. तिच्या नव्या लेखनाची वाट असोशीने पाहण्यास उद्युक्त करणारी आहे. तशी वाट पाहणारात मीही आहे. रंगनाथ पठारे
Share
