Chakravaat By Wasudeo Dahake (चक्रवात)
Chakravaat By Wasudeo Dahake (चक्रवात)
Couldn't load pickup availability
चक्रवात’ हा कथासंग्रह खेड्यातल्या जनतेच्या समोरचे प्रश्न मांडतो. खेड्यातील माणसांच्या व्यथा, संघर्ष, नैसर्गिक आव्हानांना तोंड देताना त्यांची होणारी तारांबळ या कथांमधून आपल्यासमोर येते. या कथासंग्रहात एकूण दहा कथा आहेत. प्रत्येक कथेतील पात्र आपला जीवनसंघर्ष नेटाने लढत आहे. स्वातंत्र्यमिळूनपंचाहत्तरवर्षंउलटली, तरीसामान्यमाणसांच्याभोगवट्यांतीलदु:खआजहीसंपलेलीनाहीत. शोषणाच्याकात्रीतत्यांचंकर्तनसुरूआहे याचा प्रत्यय पुस्तकातील प्रत्येक कथेतून येत राहातो. जनसामान्यांच्या जीवनातील प्रखर वास्तव मांडणारा हा कथासंग्रह वाचकांना अंतर्मुख करतो. लेखकाविषयी : डॉ. वासुदेव डहाके यांचा ‘चक्रवात’ हा चौथा कथासंग्रह आहे. नागपूरस्थित लेखक वासुदेव डहाके यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत यशस्वी जीवनाची वाट आरेखली आहे. ग्रामीण संस्कृती, नवीन प्रथांचे आक्रमण, पिढ्यांमधील संघर्ष आणि सामाजिक संक्रमण हे त्यांच्या लेखनातील प्रमुख विषय आहेत. दु:ख, पराभव, बंड, प्रेम, ममता आणि अस्तित्वाची झुंज देणाऱ्या पात्रांना जिवंतपणे उभे करण्याचे कौशल्य त्यांच्या लेखनामध्ये दिसून येते. प्रत्यक्ष अनुभव, समाजातील घटना, ग्रामीण बोलीभाषा आणि सत्यकथनाच्या आधारावर उभ्या केलेल्या कथा वाचकांना अंतर्मुख करतात आणि समाजपरिवर्तनाचा संदेश देतात.
Share
