Skip to product information
1 of 1

Brand Katdare By Arpana Velankar (ब्रँड काटदरे मराठी गृहउद्योगाच्या ग्लोबल महत्वकांक्षेची कहाणी)

Brand Katdare By Arpana Velankar (ब्रँड काटदरे मराठी गृहउद्योगाच्या ग्लोबल महत्वकांक्षेची कहाणी)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author



१९५८
साताऱ्याजवळच्या मसूर गावात एका मध्यमवर्गीय घरातल्या कष्टाळू जोडप्याने ‘कुटुंब जगवण्या’साठी म्हणून उखळात मसाला कुटायला घेतला. कागदात गुंडाळलेल्या मसाल्याच्या पुड्यांचे भारे सायकलवर बांधून गावोगावी ते विकायची धडपड सुरु झाली…

२०२५
बाळकृष्ण आणि प्रमिलाबाई काटदरे यांच्या धडपडीतून सुरु झालेली खमंग मसाले आणि चटकदार चटण्यांची ही कहाणी आता ‘काटदरे मसाले’ या नावाने थेट युरोप-अमेरिकेच्या स्वयंपाकघरापर्यंत पोचली आहे. जागतिकीकरणाच्या वादळात टिकून राहिलेल्या, स्पर्धेला तोंड देत सतत बदलत गेलेल्या एका मराठी लघुउद्योगाचा ‘लोकल’ ते ‘ग्लोबल’ प्रवास.
अडथळे कसे ओलांडले? अडचणी कशा पार झाल्या? नव्या वाटा कशा शोधल्या?

तीन पिढ्यांच्या उद्योजकतेच्या प्रवासातली ‘सिक्रेटस्’ उलगडणारी रोमांचक कहाणी… ब्रँड काटदरे

View full details