Skip to product information
1 of 1

Bolile Je By Atul Deulgaonkar (बोलिले जे..)

Bolile Je By Atul Deulgaonkar (बोलिले जे..)

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 153.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

बोलिले जे...

संवाद एलकुंचवारांशी

अतुल देऊळगावकर

रियाज हा दोन-तीन प्रकारचा असतोस्वत:ला सतत

निदान बौद्धिक पातळीवर वाढवत राहणंस्वत:ला समृद्ध करणं,

त्यासाठी अनंत प्रवास करणंअनंत वाचन करणं.

जे माहीत नाही तिथे शिरण्याचा प्रयत्न करणंआणि ती आत्म्याची निकड म्हणूनतर हे जे आहे ते आवश्यक आहेसर्व प्रकारचं त्याला कळलं पाहिजे.

त्यासाठी सतत काहीतरी करत राहिलं पाहिजेयाला मी रियाज म्हणतो.

रियाज म्हणजे जगणं!    

मला असं वाटलं की मी फक्त माध्यम आहे.

तो अनुभव येतो आणि म्हणतो की मी आता तुझ्या माध्यमातून

जरा व्यक्त होतोयअसं जर आहे तर तो अनुभव मोठाच आहे.

कुठल्याही अनुभवाचा आकार हा कॉस्मिकच असतो.

दंवबिंदूमध्ये आकाश दिसावं तसं ते आहे.

तेव्हा अनुभव एवढा भव्य जर असेल तर त्याच्यासमोर मी कोण आहे?

मी अत्यंत सामान्यअत्यंत मिडिऑकर आयुष्य जगणारा माणूस.

तेव्हा मी फक्त माध्यम आहेआणि आपण स्वत:ला धन्य समजलं पाहिजे की आपल्याला कुठल्यातरी त्या अनुभवानं निवडलंय वाहक म्हणून!

मी वाहक आहेलेखकानं अदृश्यच व्हावं शक्यतो.

अनुभव हा जीवनाचा एक आविष्कार आहे.

आणि जीवन आपल्यापेक्षा फार मोठं असतं.

त्याच्यासमोर आपण नम्रच झालं पाहिजे.

View full details