Blind Freedom By Raja Bhoyar (ब्लाइन्ड फ्रीडम)
Blind Freedom By Raja Bhoyar (ब्लाइन्ड फ्रीडम)
Couldn't load pickup availability
राजा भोयर यांच्या ‘ब्लाइन्ड फ्रीडम ’ या कादंबरीत चितारलेलं अनुभवविश्व इतकं दाहक, अस्सल आणि प्रचलित जीवनकल्पनांना तडाखे देणारं आहे की, ते वाचताना वाचक स्तिमित होऊन जातो. स्वातंत्र्यसैनिक नानासाहेब पाटील आणि त्यांचा ध्येयवाद, आदर्शवादाच्या चक्रव्यूहात सापडलेलं त्यांचं कुटुंब, वास्तव जीवन आणि व्यवहारी दुनिया यांच्या मगरमिठीत सापडलेल्या कुटुंबियांचं विदारक चित्रण मन अस्वस्थ करून सोडतं. लेखकानं उभे केलेले प्रसंग आजची विदारक सामाजिक परिस्थिती, सज्जनांची झालेली कोंडी, त्यांची ऊठसूठ केली जाणारी अडवणूक अशा काळोख्या काळाचे दाखले दाखवून देतात. भोंदूपणा, भ्रष्टाचार आणि भोग या सार्या गोष्टींनी कोणतं अत्युच्च शिखर गाठलं आहे याची एकाचढ एक अशी सालटी काढणारी उदाहरणं लेखक वाचकांपुढं मांडतो. विलक्षण वास्तववादी घटनांतून व असामान्य व्यक्तिरेखांच्या जीवनप्रवासातून ही वेगळ्या वाटेवरची कादंबरी पुढे सरकत राहते. लेखकानं ‘ब्लाइन्ड प्रâीडम’मध्ये ह्या जगाचा जो रोखठोक, अत्यंत प्रत्ययकारी असा धांडोळा घेतला आहे, तशा बाजाचं लेखन याआधी मी तरी मराठीत वाचल्याचं मला स्मरत नाही. अस्सल जीवनानुभव, अत्यंत स्फोटक, प्रत्ययकारी आणि मानवी मूल्यांच्या प्रचलित कल्पनांना धक्का देत, तुंबलेलं धरण फुटावं आणि त्यानं परिसराला गिळून टाकावं अशीच प्रचिती ‘ब्लाइन्ड फ्रीडम’ ही कादंबरी देते. - विश्वास पाटील
Share
