Black Beauty By Anna Sewell, Smita Limaye(Translators) (ब्लॅक ब्यूटी)
Black Beauty By Anna Sewell, Smita Limaye(Translators) (ब्लॅक ब्यूटी)
Couldn't load pickup availability
प्राचीन काळापासून घोडा जगभराच्या संस्कृतीचा, जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. घोडा कुत्र्यासारखा माणसाचा लाडका पाळीव प्राणी आहे. घोडा बुद्धीने तल्लख असतो आणि माणसाने केलेल्या प्रेमाला कुत्र्यासारखाच उत्तम प्रतिसाद देतो हे सर्वश्रुतच आहे.
या इमानी प्राण्यावर अॅयना सिवेल (Anna Sewell) या इंग्रजी स्त्रीने लिहिलेली ‘ब्लॅक ब्यूटी’ ही अप्रतिम कादंबरी जागतिक साहित्यात एक अजरामर कृती म्हणून प्रसिद्ध आहे. ‘ब्लॅक ब्यूटी’ हे एका घोड्याचे आत्मवृत्त आहे. ही कलाकृती जरी मागच्या शतकात लिहिली गेली तरी तिचे सौंदर्य किंवा आकर्षण तसूभरही कमी झालेले नाही. प्रकाशित झाल्यापासून ते आजतागायत ‘ब्लॅक ब्यूटी’ जनमानसात अत्यंत लोकप्रिय स्थान मिळवून आहे व तितक्याच रोचकतेने पिढ्यान्पिढ्या हे पुस्तक वाचले जातेय. प्राणिजीवनावर लिहिली गेलेली ही सर्वांत यशस्वी कादंबरी काळाच्या ओघात आजही आपले अढळ पद टिकवून आहे.
Share
