Informative Book set ( वॉरन बफे | द कंप्लिट इन्व्हेस्टर चार्ली मंगर | द बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट)
Informative Book set ( वॉरन बफे | द कंप्लिट इन्व्हेस्टर चार्ली मंगर | द बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट)
३ जगप्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट गुरूंची प्रेरणादायी चरित्रं
ही पुस्तकं, इन्व्हेस्टमेंट गुरूंची फक्त चरित्रं नसून त्यांच्या गुंतवणुकीतील प्रवासाचे, चुकांचे, अनुभवांचे सविस्तर वर्णनं आहेत. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ही चरित्रं अनेक महत्त्वाच्या युक्त्या शिकवून जातात. त्यात दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे, शेअर बाजारातल्या टाळता येण्याजोग्या चुका, कर्जं घेऊन केलेली गुंतवणूक अशा आणि इतरही मुद्दयांचा समावेश आहे.
वॉरन बफे
लेखक – टॉड ए फिंकल। पाने – 326 । किंमत – 300
जगातील सर्वांत यशस्वी आणि श्रीमंत गुंतवणूकदारांपैकी एक वॉरन बफे यांचे चरित्र. या चरित्रात त्यांच्या या अफाट यशामागील रहस्य, त्यांच्या काम करण्याची पद्धत, निर्णय घेण्याची पद्धत या सर्व गोष्टी आपल्याला समजतात आणि एक अधिक चांगला गुंतवणूकदार बनायला आपली मदत करतात.
द कंप्लिट इन्व्हेस्टर चार्ली मंगर
लेखक – ट्रेन ग्रिफिन। पाने – 252। किंमत – 300
वॉरन बफे यांचं उजवा हात असलेले त्यांचे आर्थिक भागीदार चार्ली मंगर. मंगर यांच्या गुंतवणुकीच्या धोरणाचे सर्व टप्पे त्यांच्या मुलाखती, भाषणे, लेखन, आणि भागधारकांना लिहिलेली पत्रे यामधून एकत्रित केले गेले आहेत. भावनांना गुंतवणुकीपासून दूर ठेवण्यात आणि चुकीच्या निर्णयामुळे होणारे नुकसान टाळण्यात मंगर यांचे हे चरित्र आपल्या उपयोगी येते.
द बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट
लेखक – अपराजिता शर्मा । पाने – 176। किंमत – 250
‘बिग बुल’ म्हणून विख्यात असलेल्या भारतामधले सगळ्यांत नामांकित गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला. हे पुस्तक म्हणजे, फक्त त्यांचं चरित्र नसून त्यांना प्रचंड फायदा करणाऱ्या गुंतवणुकींचं ते विस्तारानं विवेचन करतं आणि त्यांच्या चुकांचंही वर्णन करतं. त्यात दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे, शेअर बाजारातल्या टाळता येण्याजोग्या चुका, कर्जं घेऊन केलेली गुंतवणूक अशा आणि इतरही मुद्दयांचा समावेश आहे.