Bill Gates By Sudhir Sevekar And Utkarsh Sevekar (बिल गेट्स)
Bill Gates By Sudhir Sevekar And Utkarsh Sevekar (बिल गेट्स)
Couldn't load pickup availability
बिल गेट्स हे एक अफाट यशस्वी व्यक्तिमत्त्व आहेच. इतक्या कमी वयात एवढे अफाट यश मिळविणारी त्यांच्यासारखी जगात दुसरी व्यक्ती दुर्मीळ. त्याचप्रमाणे ते अत्यंत चिंतनशील असेही व्यक्तिमत्त्व आहे.
आपल्या उपजत कुशाग्र बुद्धीच्या जोरावर, अनुभवाच्या प्रशाळेतच त्यांची खरी जडणघडण झाली.
बिल गेट्स यांचं जीवन, त्यांना मिळालेलं यश, त्यांच्यावरच्या केसेस, वादविवाद हे सगळंच मोठं झंझावाती आहे. विलक्षण वेगवान आहे.
त्याची श्रीमंती, ते मिलियन, बिलियन डॉलर्सचे अवाढव्य आकडे वगैरेच्या पलीकडे हा कोण माणूस आहे, त्याचा शोध घेणे यावर आमचा भर आहे. तो शोध कितपत जमलाय ते वाचक ठरवतीलच.
कॉम्युटर सुरू केल्यावर सर्वप्रथम मायक्रोसॉफट कंपनीचा लागो कॉम्युटरच्या पटलावर आपल्याला दिसतो. या यशस्वी कार्यप्रमाणीचा आद्यप्रणेता व संस्थापक म्हणजे बिल गेट्स! खर्या अर्थाने संगणकयुगाची नांदी करणार्या, झंझावाती व प्रचंड लोकप्रियता लाभलेल्या या व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेणे तितकेच रोमहर्षक आहे.
व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ प्रगाढबुद्धिमत्ता, अथक परिश्रम व आव्हानांना पेलण्याची दुर्दम्य इच्छा याद्वारे आपले परिश्रम साम्राज्य कसे उभारतो व ते कसे टिकवतो, हे जाणून घेणे निश्चितच अचंबित करणारे आहे; परंतु त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपल्या वैयक्तिक संपत्तीचा जास्तीत जास्त भाग वंचितांच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी व गरजूंच्या शिक्षणासाठी खर्च करून बिल गेट्स यांनी सगळ्यांनाच एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. अत्यंत प्रतिभासंपन्न, दूरदर्शी व्यक्तिमत्त्वाचा माणूस व उद्योजक म्हणून आढावा घेणारे आणि बिल गेट्स या थक्क करणार्या रसायनाबाबत वाचकांच्या उत्सुकतेला न्याय देणारे पुस्तक.
Share
