Big Bang By Achyut Godbole, Dushyant Patil (बिग बँग - विश्वप्रारंभाचे थरारनाट्य)
Big Bang By Achyut Godbole, Dushyant Patil (बिग बँग - विश्वप्रारंभाचे थरारनाट्य)
Couldn't load pickup availability
लेखक - अच्युत गोडबोले, दुष्यंत पाटील
Pages - 344
(बिग बँग - विश्वप्रारंभाचे थरारनाट्य)-
या अथांग विश्वाचा प्रारंभ कसा झाला ?
विश्वाच्या प्रारंभाचा शोध घेण्याचं वेड शास्त्रज्ञांना कसं लागलं ?
विश्वाच्या प्रारंभाचे पुरावे माणसानं कसे शोधले ?
या पुस्तकात उलगडेल विश्वप्रारंभाची शोधकथा..
थक्क करणारा विश्वप्रारंभाचा थरार आणि त्याचा शोध घेताना शास्त्रज्ञांनी केलेली अचंबित करणारी धडपड जाणण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा !
सुर्यासारख्या अब्जावधी ताऱ्यांनी बनणाऱ्या गॅलेक्सीज आणि अशा अब्जावधी गॅलेक्सीजनं बनलेलं विश्व पाहिलं की अक्षरशः थक्क व्हायला होतं. या अथांग विश्वाच्या प्रारंभाचा माणसानं घेतलेला शोध हा एखाद्या उलगडत जाणाऱ्या रहस्यकथेसारखा आहे. 'बिग बँग' ही विश्वाच्या प्रारंभाची शोधकथा आहे. रात्रीच्या आकाशातल्या चांदण्यांचं निरीक्षण करायचं आणि गणित, विज्ञानातले नियम वापरत निव्वळ तर्काच्या आधारावर विश्व कधी आणि कसं निर्माण झालं याचा शोध घ्यायचा म्हणजे माणसाची एक उत्तुंग झेप आहे ! या शोधकथेत एकामागोमाग एक झपाटलेले शास्त्रज्ञ येतात आणि विश्वाच्या निर्मितीच्या रहस्यांचा उलगडा करताना दिसतात.
Share
