Bhuvaikunth By Kishor Sanap (भूवैकुंठ)
Bhuvaikunth By Kishor Sanap (भूवैकुंठ)
Couldn't load pickup availability
भूवैकुंठ, भि. ग. रोहमारे साहित्य पुरस्कार प्राप्त.
कौसल्याच्या आयुष्यातलं दुःख पर्वताएवढं आहे. ज्यांच्या संगतीनं संसाराचा गाडा रेटावा त्यानं अर्ध्यावर साथ सोडली. आप्तेष्टांनी आगळीकचं केली. ज्यांच्यासाठी हाडांची काडं केली, त्या पोटच्या पोराच्या बायकोने उभा दावा धरला. तरी, कौसल्या कोसळली नाही. वेडी झाली नाही. पंढरीच्या वारीनं, सावळ्या विठ्ठलानं, संतांच्या अभंगानं, तिला भंगू दिलं नाही. सुखाची आवडी असलेल्या मनाला दुःखाचाही स्वीकार सहजभाव करायला शिकवलं. पाय घट्ट रोवून आयुष्यात खंबीरपणे उभं केलं. अखेरीस, संसाराच्या भवतापातून मुक्तही केलं. जगण्याच्या कलेचं रोकडं तत्त्वज्ञान सांगणारा वारकरी पंथ मराठी कादंबरीत पात्रांच्या जगण्याशी इतका एकजीव झालेला यापूर्वी कधी दिसला नाही. वऱ्हाडी बोली, तिच्यातल्या धारदार म्हणी, वाक्प्रचारम आष्टीचा स्वातंत्र्य संग्राम, शहिदांना स्फूर्ती देणारी राष्ट्रसंत तुकडोजींची भजनं अशा अस्सल एतद्देशीय वाणांनं आणि सावजी महाराज-ज्ञानेश्वरच्या विद्रोहानं या कादंबरीला बहुआयामी केलं आहे. वाचणाऱ्याच्या मनाला नवी सकारात्मक उभारी दिली आहे. एक चांगल्या वाड्मय कलाकृतीला यापेक्षा लई मागणे नाही.
डॉ. श्रीकृष्ण राऊत, अकोला
माझे मराठी वाङ्मयाचे वाचन बेताचेच असले तरी गेल्या दहा-पंधरा वर्षांत तरी भूवैकुंठ सारखी कादंबरी माझ्या वाचनात आलेली नाही. उद्धव शेळके यांच्या कौतिक(धग) या नायिकेनंतर तुमची कैसाल्याच मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ नायिका ठरावी. असे तुमचे लेखन आहे. हार्दिक अभिनंदन.
डॉ. रावसाहेब कसबे, यांच्या पत्रांतून
Share
