Skip to product information
1 of 2

Bhramanti By Shri. P.G. Pedanekar(भ्रमंती -पु. गो. पेडणेकर)

Bhramanti By Shri. P.G. Pedanekar(भ्रमंती -पु. गो. पेडणेकर)

Regular price Rs. 125.00
Regular price Rs. 125.00 Sale price Rs. 125.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

तुमच्या 'भ्रमंती' या प्रवास वर्णन संग्रह पुस्तकाला मी प्रस्तावना लिहावी असं प्रेमाने तुम्ही म्हणालात. मी तसा सामान्य. पण मित्राबद्दल चांगलं लिहिण्याची संधी आलेली आहे, ती मी कां दवडू? म्हणून मी होकार दिला.

आम्ही बालपणापासूनचे मित्र, शेजारी शेजारी अगदी लंगोटी यार आणि दुसरं म्हणजे तुमच्या या संपूर्ण 'भ्रमंती' ला मी तुमच्या सोबत साक्ष आहे.

आम्ही शिक्षकी सेवेत असताना डिचोली (गोवा) तालुका शिक्षक पतपेढीचा दरवर्षी अभ्यास दौरा सहभागी व्हायचा. दरवर्षी पन्नासच्या जवळपास शिक्षक वृंद तालुकाध्यक्ष या नात्याचे दौऱ्याचं आयोजन-नियोजन, आखणी माझ्याकडे असायची. त्या विषयाची मला आवड पण आहे. हरिद्वार-ऋषिकेश पासून कन्याकुमारी व द्वारका (गुजरात) ते काशी असा दोनदा तीनदा प्रवास झालेला आहे. पण प्रवास वर्णन शब्दांकीत करण्याचं तुमच्या सारखं काम मला कधी जमलं नाही.

प्रवास चालू असतांना चौकस बुध्दीने काही गोष्टी माहीत करुन घेणे, टाचण ठेवणे, प्रवास वर्णन शब्दबध्द करणे, वर्तमान पत्रातून प्रसिध्दीसाठी देणे, ह्या गोष्टी तुम्ही आजवर करीत आलांत. लेखन, चौफेर वाचन, वाचलेलं संग्रहीत करणे, कविता रचणे हा तुमचा छंद आहे.

वर्तमान सामाजिक घडामोडीवर देखील परखडपणे तुम्ही तुमचे विचार वर्तमान पत्रातून मांडलेले आहेत. तो तुमचा स्वभाव विशेष आहे. तुमचं लेखन साहित्य प्रसिध्दीला देताना व प्रसिध्द झाल्यावर देखील त्याच्या नक्कल प्रती तुम्ही वेळोवेळी मला दिलेल्या आहेत, त्या पण माझ्या संग्रही आहेत.

पाने 143

View full details