Bhatiya Shikshansanskrutiche Shilpakar By Sachin Usha Vilas Joshi (भारतीय शिक्षणसंस्कृतीचे शिल्पकार)
Bhatiya Shikshansanskrutiche Shilpakar By Sachin Usha Vilas Joshi (भारतीय शिक्षणसंस्कृतीचे शिल्पकार)
Couldn't load pickup availability
शिकणारे बालक हा विषय केंद्रस्थानी ठेवून शिक्षणाचा वैचारिक इतिहास आपण या पुस्तकातून जाणून घेऊ शकतो. शिक्षणाचे स्वरूप कसे असायला हवे हे विविध ज्ञानोपासकांच्या उदाहरणांद्वारे या पुस्तकात सांगितले आहे. 'प्रश्न विचारा', 'वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा', 'जिज्ञासा निर्माण करा', 'विचार हाच शिक्षणाचा पाया असतो' अशी अनेक पथदर्शक विचारविधाने या पुस्तकात ठिकठिकाणी उद्धृत केलेली आहेत. - प्रा. रमेश पानसे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
रवींद्रनाथ टागोर, ओशो, संत रामदास अशा अनेक विचारवंतांविषयी आपण वाचतो; पण आपल्याला त्यांच्यातील शिक्षक ओळखता येत नाही. सचिन जोशी यांना नेमकेपणाने या महापुरुषांमधला शिक्षक सापडलेला आहे. त्यांचे मार्गदर्शक विचार लेखकाने साध्या, सोप्या भाषेत आपल्यासमोर आणले आहेत. त्यातून शिक्षण काय नि कोणतं घ्यायला हवं हे ते सांगतात. - संदीप वासलेकर, आंतरराष्ट्रीय विचारवंत
आजच्या शैक्षणिक धोरणातील बहुतांश मुद्द्यांची पाळेमुळे संतांच्या तसेच समाजसुधारक आणि विचारवंतांच्या विचारांमध्ये दडलेली आहेत याची जाणीव करून देणारे श्री. सचिन जोशी यांचे हे पुस्तक या पार्श्वभूमीवर निश्चित स्वागतार्ह आहे. देश उभारणीमध्ये हातभार लावणाऱ्या घटकांना घडवण्याचे काम शिक्षक प्राथमिक शाळेपासूनच करतात. या लेखांचा परिपाक म्हणून जर आजचे शिक्षक हे प्रेम, ज्ञान आणि तटस्थता या गुणांनी परिपूर्ण झाले तर उद्याचा भारत निश्चितच जगातील महासत्ता होईल. - सूरज मांढरे (भाप्रसे), शिक्षण आयुक्त
Share
