Bhatak Bhawani By Samina Dalvai (भटक भवानी )
Bhatak Bhawani By Samina Dalvai (भटक भवानी )
Couldn't load pickup availability
समीना दलवाई भटक भवानी बहुजन स्त्रीवादी नजरेतून जगाचा ऊहापोह...
"केवळ भारतातील नाही तर जगभरातील माणसांना भेटलेली, त्यांच्या वंश, धर्म, जात आणि लिंगभावाला चिकटलेल्या वास्तवासकट त्यांना जाणून घेणारी ही भटकभवानी लिहिते तेव्हा आत्मकेंद्री होत चाललेल्या आजच्या वाचकांना खडबडून जागं करते. आज समाज म्हणून असंवेदनशील होत चाललेल्या लोकांना समीनाचे हे लेख वाचल्यावर पोतराजासारखे स्वतःवरच आसूड ओढावेसे वाटतील. हे सारेच लेख संस्कृतीचा अर्थ जाणून न घेता तिचा वृथा अभिमान बाळगणाऱ्या आणि आंधळ्या धर्म- राष्ट्रप्रेमानं गदगदून आलेल्या लोकांना सणसणीत चपराक मारतात. अवघ्या विश्वाशी त्यातील वेदनेशी एकरूप होतानाच प्रेमाचं, करूणेचं गीत गाणारं समीना दलवाई सारखं विचारी तरूण रक्त आपल्यात आहे ही भावना आजच्या बीभत्स कोलाहलात 'सुकून' देणारी आहे." - नीरजा लेखिका