Skip to product information
1 of 1

Bharatmatechya Martutvan Kanya By Vitthal Ray Bhat (भारत मातेच्या कर्तुत्वन कन्या- विठल राय भट )

Bharatmatechya Martutvan Kanya By Vitthal Ray Bhat (भारत मातेच्या कर्तुत्वन कन्या- विठल राय भट )

Regular price Rs. 50.00
Regular price Rs. 50.00 Sale price Rs. 50.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

भारतीय समाजात गेल्या अनेक शतकांपासून, विशेषतः 'मनुस्मृती' काळापासून स्त्रियांचे सामाजिक स्थान झपाट्याने खालावत चालले आहे. स्त्रीला अतिशुद्रांच्या पंक्तीला बसवून तिला शिक्षण व स्वातंत्र्यापासून वंचित करण्यात आले. वेदकाळात मात्र तशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी स्त्रीयांचे मुंज (उपनयन संस्कार) होत असे. वेदांतील अनेकानेक ऋचा-गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, इला, शचि, सविता, सरस्वती इत्यादी स्त्रियांनी रचिल्या होत्या. याचे स्पष्ट उल्लेख सापडतात. भास्कराचार्यांची मुलगी-लीलावती तर गणितज्ज्ञ, ज्योतिषी व सकल शास्त्रांत पारंगत होती. तिला आचार्य ही पदवी प्राप्त होती व ती गुरूकुल चालवत असे. आदिमानव प्रारंभी गुहांतून रहात असे व नंतर टोळी करून राहू लागला. तेव्हा त्या आदिम समाजात मातृसत्ताक पद्धती प्रचलित होती. हळूहळू शेतीचा शोध, अग्नीचा शोध, वन्यप्राणी माणसाळण्याची युक्ती प्राप्त झाली. नैसर्गिकरित्या येणारे गरोदरपण, बाळंतपण व मग मुलांचे पालनपोषण यात बराच काळ स्त्रीचा व्यतीत होऊ लागला व मातृसत्ताक पद्धत लयाला जाऊन पित्तृसत्ताक जीवनपद्धती अमलात आली. पुरुषाने सर्व कारभार आपल्या हाती घेतला व स्त्रीला एक भोगवस्तू बनवली. तिला उंबरठ्याबाहेर पडण्यास बंदी, शिक्षणबंदी, निवडीच्या स्वातंत्र्यावर बंदी अशा अनेक बंधनातून जखडण्यात आले. त्यामुळे स्त्रीची सर्व त-हेची प्रगती पूर्णतया थांबली व तिच्या नशिबी फक्त गुलामगिरीचे आयुष्य आले. तुलसीदासाने आपल्या 'रामचरितमानस' या महाकाव्यातर स्पष्टपणे लिहिलेले होते. पाने 64

View full details