Skip to product information
1 of 1

Bharatatil Samajik Chalvali By Ghanshyam Shah ( भारतातील सामाजिक चळवळी)

Bharatatil Samajik Chalvali By Ghanshyam Shah ( भारतातील सामाजिक चळवळी)

Regular price Rs. 298.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 298.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

व्यक्तिगत  पातळीवर, संघटनेविना सुरू झालेले प्रयत्न हे सामाजिक सुधारणांचे प्राथमिक स्वरूप आहे. या प्रयत्नांना राजकीय विचारवंतांचा पाठिंबा मिळाला, तर सामाजिक बदल होण्यास सुरुवात होते. हे भारतात कित्येक शतकांपासून सुरू आहे. पण अलिकडेच या चळवळींचा सखोल अभ्यास करण्याची पद्धत सुरू झाली आहे.
 या संपूर्णपणे पुनरवलोकित व अद्ययावत मूळविचारी पुस्तकामध्ये भारतातील सामाजिक चळवळीचे नऊ प्रमुख प्रकारात वर्गीकरण केले आहे. यात चळवळीतले कार्यकर्ते व चळवळ कशासाठी या दोन निकषांचा वापर केला आहे. उदा. शेतकरी, टोळ्या, दलित, मागासवर्गीय, स्त्रिया, विद्यार्थी, मध्यमवर्गीय, कामगार, मानवी अधिकार, निसर्ग व पर्यावरण इ. मूळ मुद्दा, त्याबद्दलची मूलतत्त्वे त्या क्षेत्रात काम करणारी संघटना व त्यांचे नेतृत्व या सार्याचा अभ्यास या प्रत्येक प्रकरणात केला आहे.
 या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून प्रा. शाह यांनी त्या प्रत्येक प्रकरणाबाबतचे उपलब्ध साहित्य, लिखाण परखडपणे परीक्षण करून १८५७ ते आजतागायत या कालखंडातील चळवळींबाबत लिहिले आहे. यात त्यांनी संबंधित प्रकरणांचे सविस्तर विवेचन करून विविध अभ्यासकांनी त्याबाबत केलेल्या लिखाणाचे परिशीलन केले आहे. शेवटी भविष्यात कशा प्रकारचे संशोधन करावे याचेही विवेचन केले आहे.
 भारतीय सामाजिक चळवळीचे तर्कदृष्ट्या वर्गीकरण करताना या पुस्तकाची पुष्कळ मदत सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना होईल, तसेच राजकीय ऐतिहासिक व समाजशास्त्रीय चळवळीतील कार्यकर्त्यांना पण होईल. सामाजिक चळवळीतील अभ्यासक्रमाशी संबंधित विद्यार्थ्यांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
 

View full details