Bharat Saasne Book set (३ पुस्तकांचा संच )
Bharat Saasne Book set (३ पुस्तकांचा संच )
Couldn't load pickup availability
समशेर आणि भूतबंगला
आपला मित्र समशेर कुलुपघरे उर्फ ‘शेरलॉक होम्स’ त्याच्या मित्राच्या निलेशच्या घरी सुट्टीवर राहायला आलेला आहे. आणि तो एकटाच नाहीये,तर सगळी टीमच आहे त्याच्याबरोबर. सुट्टीमध्ये धमाल करायचा त्यांचा विचार. पण निलेशच्या राहत्या ऐतिहासिक वाड्यात अप्पासाहेबांना चक्क भूत दिसलेलं आहे.एक नाही, दोन नाही तर तीन तीन भुतं दिसलेली आहेत. एक हवेत तरंगतं, एक उंचाड खिडकीतून दिसतं, तर तिसरं मेणबत्तीवालं भूत आहे.भुतं नसतात असं समशेरचं म्हणणं. पण ही भुतं पाहिल्याचं सांगणारे साक्षीदार तर पुष्कळ आहे. समशेर नाईलाजाने या तपासकथेत ओढला गेलाय.आणि मग सुरू होतो पहिला रोमांचकारी तपास. आणि समशेरचा दुसरा असाच तपास असतो मोतीच्या शोधाचा.समशेरचा मित्र गंपूच्या कुत्र्याचं नाव मोती! हा मोती! हा मोती सर्वांचा लाडका! आणि हा मोती नेमका नाहीसा झालाय. कुणीतरी त्याला पळवून नेलंय!गंपूने तर मोती सापडेपर्यंत अन्न पाणी न घेण्याची प्रतिज्ञाच केलीय. मग सुरू होतो समशेरचा आणि मित्रमंडळींचा तपास. तिसर्या प्रकरणातएक दुर्मिळ असं लपवून ठेवलेलं पोस्टाचं तिकिट त्याला शोधून काढायचं आहे. होतो का यशस्वी तो या प्रकरणांमध्ये?जाणून घेण्यासाठी तुम्हाला वाचाव्या लागतील समशेरच्या बुद्धिचातुर्यसाहसकथा!
समशेर आणि लांब मिशीवाल्या माणसाचं रहस्य
सुनंदाताईला एक लांब मिशीवाला माणूस रोज दिसतोय. आश्चर्य म्हणजे हा माणूस वेगवेगळ्या ठिकाणी तिला दिसतो. एकच माणूस
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला पुन्हा पुन्हा कसा काय दिसेल असा सगळ्यांचा सवाल आहे. त्यामुळे बिचार्या सुनंदाताईवर कोणी विश्वासच ठेवत नाही. पण पाहुणा म्हणून आलेल्या एका मुलाने मात्र खणखणीत आवाजात तिला सांगितलं की ताई माझा तुझ्यावर विश्वास आहे!या मुलाचं नाव समशेर कुलुपघरे. येथून सुरू होतो रोमांचकारी शोधाचा प्रवास. आणि या वेळेस चाळीस मिनिटातच एक राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरणाचं
कोडं सोडवायचं अवघड असं आव्हान समशेरला स्वीकारावं लागलेलं आहे. आणि घोड्याचं रहस्य तर अफलातूनच. सगळ्यांची मती गुंग करणारं.
पण समशेर या रहस्याकडे वेगळ्याच नजरेने पाहतो आहे. सुटेल त्याला हे कोडं? जाणून घेण्यासाठी वाचाव्या लागतील
समशेरच्या या तीन रोमहर्षक बुद्धिचातुर्यसाहसकथा.
समशेर आणि परग्रहावरचा माणूस
परग्रहावरून काही रहस्यमय जीव शहरात आले आहेत. अशी बातमी वेगाने पसरते आहे. त्या मुळे शहरात भयाचं वातावरण आहे.त्यातून, सुनंदाताईंच्या मामांनाच ही परग्रहावरची मणसं म्हणजे ‘एलियन’ दिसलेली आहेत. आणि म्हणून आपला समशेर, त्यच्या सगळ्या ‘टीम’सह.या प्रकरणात ओढला गेला आहे. समशेर कसं सोडवतो हे रहस्य? केवळ लॅपटॉपवर काही मिनिटांची चित्रफित पाहून,समशेरने गती गुंग करणारं कोडं सोडवून नंदूभैय्याला मदत केली आहे. आणि तिसर्या एका प्रकरणातअंध संगीतकार श्रीपदराव यांच्या अंगठीची अदलाबदल झालीय. आता ही अदलाबदल कोणी केली असेल.या आणि अशाच रहस्यमय शोधांची उकल समजून घेण्यासाठी वाचा समशेर कुलुपघरे – भारत ससाणे |
Share
