Bhaktiparamparecha Antaraprantiy Anubandh By Satish Badwe (भक्तिपरंपरेचा आंतरप्रांतीय अनुबंध)
Bhaktiparamparecha Antaraprantiy Anubandh By Satish Badwe (भक्तिपरंपरेचा आंतरप्रांतीय अनुबंध)
Couldn't load pickup availability
डॉ. सतीश बडवे हे मराठी साहित्याचे जाणते आणि महत्त्वाचे अभ्यासक आहेत हे सर्व परिचितच आहे. विशेषतः मध्ययुगीन मराठी साहित्याचा त्यांनी खोलवर धांडोळा घेऊन त्यासंबंधी काही महत्त्वाची सूत्रे मांडलेली आहेत. प्रस्तुत ग्रंथात त्याच्या आणखी पुढे जावून त्यांनी 'भक्तिपरंपरेचे आंतरप्रांतीय अनुबंध' मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सभोवताली धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय व्यवस्था भ्रष्ट आणि खिळखिळी होत असल्याच्या काळात कींनी त्याला प्रतिक्रिया देवून अगदी सरळ सोप्या उपासनामार्गाचा पुरस्कार करून समाजाची नवी बांधणी केली. महाराष्ट्रात रामदेवराय यादवाच्या पतनापासून नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ ते तुकाराम म्हणजे शिवाजी राजाचा उदय असे ते झाले. विशेष म्हणजे असेच कार्य आंध्र, कर्नाटक, तमिळनाड, पंजाब, उत्तरेतील प्रांत, बंगाल, असे सगळीकडेच जवळपास एकाचवेळी घडले. हा अत्यंत महत्त्वाचा अनुबंध शोध हे या ग्रंथाचे सगळ्यात मोठे फलित आहे, असे मला वाटते. आपली भारतीय एकात्मता ही वरवरची नसून तिची अशी आंतरिक बैठक आहे याची महत्त्वाची जाणीव हा ग्रंथ करून देतो. तीच याची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. रंगनाथ पठारे
Share
