Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
प्रेम तुम्हाला खुणावील तेव्हा त्यामागून चालू लागा. त्याच्या वाटा खडतर चढणीच्याअसतील. त्याच्या पंखांत पोलादाची पाती असतील, ती तुम्हाला जखमी करतील.तुमची मुलं तुमची नसतात. ईश्वरी चैतन्याच्या आत्मीय प्रेरणेची ती पुत्र आणि कन्याअसतात. तुमच्यामधून ती जन्म घेतात. तुमच्यापासून नव्हे.तुम्ही काम करता याचा अर्थ तुम्ही एक बासरी होऊन राहता. जिच्या अंतर्यामातूनप्रहराप्रहरांचे निःश्चास संगीत होऊन येतात. सगळं विध एकात्मतेनं गुंजार करीतअसताना, तुमच्या जीवनाची बासरी मुकी आणि अबोल कशी राहू शकेल?कालसमुद्रावर संचार करणाऱ्या तुमच्या जीवनौकेचा सुकाणू युद्धीच्या हाती आहे.तुमच्या भावना आणि वासना तिथी शिडं आहेत. सुकाणू तुटला किंवा शिडं फाटलीतर काय होईल?मृत्यूचं रहस्य जाणून घ्यावं अशी तुम्ही इच्छा करता, पण जीवनाच्या ऐन धामधुमीतते न शोधाल तर तुम्हाला ते कसं गवसेल? जीवन आणि मृत्यू ही अभिन्न आहेत.नदी आणि समुद्र यांच्यासारखी.स्वप्नांवर विश्वास ठेवा. कारण त्यांच्यात तर अनंत अस्तित्वाकडे नेणारी देशउघडणारी असते.माझे शब्द तुम्हाला संदिग्ध वाटत असतील, तरी ते तसेच घ्या. त्यांना साफसूफकरायला बघू नका. आणखी एका स्वप्नात तुमचे-माझे हात जुळतील सरआकाशात आणखी एक मनोरा उभा करूया.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books