Skip to product information
1 of 5

Bestselling Author Yuval Noah Harari's 5 -book set

Bestselling Author Yuval Noah Harari's 5 -book set

Regular price Rs. 2,125.00
Regular price Rs. 2,500.00 Sale price Rs. 2,125.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

1) होमो डेअस - 

होमो डेअस मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध

जुन्या रुजलेल्या संकल्पनांचा जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि जेनेटीक इंजिनीअरींग यांसारख्या जणू परमेश्वरासारखी शक्ती बहाल करणाऱ्या तंत्रज्ञानाशी संयोग झाला तर काय घडू शकेल, याचा या पुस्तकात वेध घेण्यात आला आहे.

होमो डेअस या पुस्तकात मानवाला एकविसाव्या शतकात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या मोठ्या भविष्यवेधी कार्यक्रमाची चिकित्सा केलेली आहे. आतापर्यंत हे पुस्तक जगभरातील पन्नास भाषांत अनुवादित झालेले आहे व त्याच्या सुमारे साठ लाख प्रतींची विक्री झालेली आहे.

2) सेपियन्स-मानवजातीचा संक्षिप्त इतिहास-
आगीनं
आपल्याला शक्ती दिली.
संवादानं
आपल्याला सहकार्य करण्यास मदत केली.
शेतीनं
आपल्याला अधिकाधिक लोभी केलं.
मिथकांनी
कायदा आणि व्यवस्था राखली.
पैशानं
आपल्याला खरंच विश्वास ठेवता येईल अशी गोष्ट दिली.
अंतर्विरोधांनी
संस्कृती निर्माण केली.
विज्ञानानं
आपल्याला घातक केलं.
क्षुल्लक कपीपासून आपण जगावर राज्य करणारे मानव कसे झालो, याचा इतिहास सांगणारं थरारक कथन…

3) नेक्सस- 
कथांनी आपल्याला जवळ आणलं, बांधून ठेवलं. पुस्तकांनी आपल्या कल्पनांचा आणि मिथकांचा प्रसार केला.
इंटरनेटने आपल्याला अमर्याद ज्ञानाची कवाडं खुली करून दिली. अल्गोरिदमला आपली गुपितं समजली
आणि आता ते आपल्याला एकमेकांशी झुंजवत आहे. एआय काय करेल ?
नेक्सस म्हणजे आपण या क्षणापर्यंत कसे पोचलो  याबद्दलचं थरारक कथन… हे पुस्तक येत्या काळात टिकून राहण्यासाठी आणि आपला विकास साधण्यासाठी आपण कोणते निर्णय घेतले पाहिजेत आणि कोणत्या निवडी आत्ताच केल्या पाहिजेत, याचा जाहीरनामा आहे

4) २१ व्या शतकासाठी २१ धडे-

आपण कल्पित-कथा रचल्या आपल्या प्रजातींनी एकत्र यावं यासाठीआपण निसर्गाचं दमन केलं स्वतः शक्तिशाली होण्यासाठीआता आपण जीवनाची पुनर्रचना करत आहोत आपल्या अतिरानटी इच्छांच्या पूर्ततेसाठीपण आपण याहून अधिक स्वतःला ओळखलंय का ? की आपण लावलेले शोध आपल्यालाच असंबद्ध ठरवणार आहेत ?मती गुंग करून टाकणाऱ्या आजच्या युगात माणूस असणं म्हणजे नेमकं काय, याचा केलेला उलगडा म्हणजे२१ व्या शतकासाठी २१ धडे हे पुस्तक !

5) Unstoppable Us - अनस्टॉपेबल अस-आपण माणसं सिंहांप्रमाणे शक्तिशाली नाहीयोत.आपण माणसं डॉल्फिनप्रमाणे उत्तम पोहू शकत नाही. आणि अर्थात, आपल्याला काही पंखही नाहीत उडायला! मग तरी आपण जगावर राज्य कसं काय गाजवतो?याचं उत्तर आहे विलक्षण वेगळ्या गोष्टींमध्ये दडलेलं. आणि हो, ही गोष्ट खरी आहे बरं!मॅमथची शिकार करण्यापासून स्मार्टफोनवर गेम खेळण्यापर्यंत – आपण इथपर्यंत कसे आलो, असा प्रश्न तुम्हाला पडालाय का कधी ? आपण असे… अनस्टॉपेबल-अजिंक्य कसे झालो?
सत्य असं की, आपल्याकडे विलक्षण अशी सुपरपॉवर आहे – गोष्टी- कथा सांगण्याची.
आपली गोष्ट सांगण्याची ही सुपरपॉवर वापरून माणसाने जगावर राज्य कसं केलं ? हे जाणून घेऊ या पुस्तकातून…
आणि जग बदलण्याकरता तुम्ही या सुपरपॉवरचा कसा उपयोग करून घेऊ शकता ?
हेही समजून घेऊ या…

View full details