Skip to product information
1 of 5

Bestseller books for Self Helf ( 5 book set)

Bestseller books for Self Helf ( 5 book set)

Regular price Rs. 934.00
Regular price Rs. 1,168.00 Sale price Rs. 934.00
20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

1) 30 DAYS : Change Your Habits, Change Your Life | 30 डेज : सवयी बदला, आयुष्य बदलेल
काही लोकांना इच्छित ते सगळं काही मिळतं आणि काहींना मिळत नाही. याबाबत तुम्हाला कधी कुतूहल वाटलं आहे का?
आयुष्यात बदल घडण्याची वाट पाहून तुम्ही थकून गेला आहात का?
आयुष्यात काही चमत्कार घडून आयुष्य बदलण्याची अपेक्षा तुम्ही अजून किती काळ करत राहणार?
आपल्याला हवं तसं आयुष्य घडविण्यासाठी काय करावं लागतं, हे तुम्हाला ‘30 डेज – चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ’ या साधे सोपे उपाय सांगणाऱ्या आणि प्रवाही भाषाशैली असणाऱ्या पुस्तकातून शिकायला मिळेल.
आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेले लेखक मार्क रेक्लाऊ यांनी या पुस्तकातून काही उपयुक्त आणि अनुभवाच्या कसोटीवर खऱ्या ठरलेल्या सूचना, युक्त्या आणि स्वाध्याय दिले आहेत.
या सूचना अंगी बाणवून दीर्घकाळ, सातत्यानं अमलात आणल्या तर आयुष्यात कल्पनेपलीकडे सुधारणा होते. ‘30 डेज – चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ’ यातली एक चांगली गोष्ट अशी की, नव्या सवयी अंगी बाणवून तुम्ही उद्दिष्टाच्या दिशेनं सातत्यानं, कणाकणानं पुढे सरकू शकता. हे कसं शक्य आहे, हे या पुस्तकातून तुम्हाला समजेल.
तुम्ही हे करू शकता! तुमच्या अंगी पात्रता आहे हे करण्याची! या पुस्तकानं खरोखरच आयुष्यात बदल घडतो आणि तुम्ही एक अधिक आनंदी, आरोग्यपूर्ण, समाधानकारक आयुष्य निर्माण करू शकता. यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल : आपोआप बदल घडण्याची वाट पाहणं थांबवून, बदल घडवतील अशा कृती प्रत्यक्षात सुरू कराव्या लागतील!

2) How to Develop Self-Confidence and Improve Public Speaking | हाउ टू डेव्हलप सेल्फ कॉन्फिडन्स अॅण्ड इम्प्र्ाूव्ह पब्लिक स्पीकिंग-
लोकप्रिय वक्ता कसे व्हावे? हे या व्यवहार्य, सुगम आणि मौल्यवान मार्गदर्शकातून जाणून घ्या हे पुस्तक तुम्हाला व्यवहार्य आणि आचरणात आणण्याजोगे सोपे उपाय सांगते, ज्यांच्या मदतीने तुम्ही लोकांसमोर उत्तम प्रकारचे भाषण करू शकाल आणि प्रारंभापासूनच श्रोत्यांचे लक्ष वेधून घेऊ शकाल.
प्रस्तुत पुस्तकात डेल कार्नेगी जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या वक्त्यांच्या महत्त्वपूर्ण भाषणांचे विश्लेषण करतात- थेट अब्राहम लिंकनपासून ते रुझवेल्टपर्यंत. भाषणकलेसाठी आवश्यक कौशल्यांचे महत्त्व ठसवण्यासाठी लेखकाकडून सामान्य माणसाला तोंड द्यावे लागणारे प्रसंग आणि निवडक उदाहरणांचे दाखले दिले आहेत. काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली आणि पर्वतासारखी अचल खालील तत्त्वे तुम्हाला मदतीचा हात देतील : संयम आणि आत्मविश्वास मिळवा स्मरणशक्ती तल्लख करा भाषणाची सुरुवात परिणामकारक आणि शेवट छाप पाडणारा करा श्रोत्यांच्या मनात उत्सुकता जागवा शत्रुत्व न मिळवता वादविवादात जिंका व्यावसायिक प्रशिक्षक असलेल्या लेखकाच्या अनेक वर्षांच्या अनुभवाचे सार या पुस्तकातून समजून घ्या. तुमचा आत्मविश्वास परत मिळवा आणि लोकांसमोर भाषण करण्याच्या भीतीवर नियंत्रण मिळवा.

3) How To Enjoy Your Life And Your Job | हाउ टू एन्जॉय युवर लाइफ अॅण्ड युवर जाब

ल कार्नेगी यांच्या अनेक पुस्तकांपैकी ‘हाउ टू विन फ्रेंड्स अॅण्ड इन्फ्लुअन्स पीपल’, ‘हाउ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिव्हिंग’, ‘हाउ टू एन्जॉय युअर लाइफ अॅण्ड युअर जॉब’ ही पुस्तकं तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील परिपूर्णतेचा आनंद मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत.

या पुस्तकांतून तुम्हाला खालील गोष्टी शिकायला मिळतील.
आपल्या व्यवसायात कार्यसंतुष्ट राहणं.
स्वत:ची बलस्थानं वृद्धिंगत करणं.
कंटाळा आणि नैराश्यावर मात करणं.
व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात समतोल साधणं.

आयुष्याला एक वेगळं वळण देणाऱ्या या पुस्तकाने जगभरातील लोकांना मदत केली आहे. ‘हाउ टू एन्जॉय युअर लाइफ अॅण्ड युअर जॉब’ हे पुस्तक तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाच्या यशस्वितेची गुरुकिल्ली आहे.

4) How to Stop Worrying and Start Living | हाउ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिविंग-

हाउ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिव्हिंग’ हे डेल कार्नेगी यांचं सेल्फ हेल्प प्रकारातील पुस्तक आहे. कार्नेगी हे जगभरातील विख्यात सेल्फ हेल्प तज्ज्ञांपैकी एक म्हणून ओळखले जातात.
वाचकांना अधिक आनंददायी आणि समाधानकारक जीवनशैली जगण्यास प्रवृत्त करणं आणि त्यांना केवळ स्वत:बद्दलच नव्हे तर इतरांबद्दलदेखील अधिक जागरूकतेनं विचार करायला लावणं हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. वाचकांना आयुष्यातील महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करता यावं यासाठी कार्नेगी दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या घडामोडींचा वेध घेतात. या पुस्तकात वाचकांसाठी आहेत मन:शांती आणि आनंदाच्या मार्गावर नेणारा दृष्टिकोन आत्मसात करण्यासाठीचे सात मार्ग –

तुमचं आयुष्य बदलून टाकणारे आठ शब्द जाणून घ्या.
बदला घेताना चुकवावी लागणारी मोठी किंमत टाळा.
कृतज्ञतेची अपेक्षा न ठेवता, केवळ दातृत्वाच्या आनंदासाठी देत रहा.
जे मिळालंय ते मोजा, अडचणी मोजू नका.
स्वत:ला ओळखा… पृथ्वीवर तुमच्यासारखं इतर कोणीही नाही हे कायम लक्षात असू द्या.
लोकांनी दगड फेकून मारलेत ? तेच घेऊन महाल उभा करा!
इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल असं एक तरी सत्कर्म रोज करा.

5) Lifestyle | लाईफस्टाईल-

तुमची ‘लाईफस्टाईल’ कशी असावी?
हे ठरवायचं तुमचं तुम्हीच!
तो अधिकार आणि स्वातंत्र्य फक्त तुम्हालाच,
इतर कुणालाही नाही.

… पण हे ठरविण्यासाठी आणि उभारण्यासाठी जो
विचारधारणांचा मजबूत आधार हवा – तो ‘धारण’
म्हणजे हे पुस्तक!

पूर्वी घराचा तोल सांभाळणारा
जो मध्यवर्ती खांब असायचा
त्याला ‘धारण’ म्हणत असत.
या पुस्तकातील मूलगामी चिंतन आणि संकल्पना
तुम्हाला जीवनाचा तोल सांभाळायला मदत करतील.

एकविसाव्या शतकातील बदलती जीवनशैली,
पतिपत्नी व इतर नातेसंबंध, मुलांचं संगोपन आणि
व्यक्तिमत्त्वविकास, संस्कृती, आरोग्य, आहार,
वेळ-श्रम-पैसा यांचं गणित, करिअर, संस्कार,
वृद्धापकाळाचं नियोजन, अध्यात्म, पर्यावरण,
तणाव मुक्ती, टाईम मॅनेजमेंट… इत्यादी.

अशा अनेक बाबतीत ज्ञान आणि भान आणणारं,
‘डोळे उघडणारं’ पुस्तक!

View full details