Skip to product information
1 of 1

Bandhudvesh (Purvardha) By Govind Narayan Datarshastri

Bandhudvesh (Purvardha) By Govind Narayan Datarshastri

Regular price Rs. 323.00
Regular price Rs. 380.00 Sale price Rs. 323.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

बंधुद्वेष (पुर्वार्ध व उत्तरार्ध)

बंधद्वेष ही पूर्वार्ध व उत्तरार्ध मिळून 760 पानांची कादंबरी आहे. राजकुलातील दोन बंधुची एकमेकाच्या द्वेषातून झालेली फरपट या कादंबरीतून रंगवली आहेनेहेमीप्रमाणेगो. ना. दातारांनी याही कादंबरीत राजवाड्यातील कारस्थाने, देवाला लावलेला कौल आहे, द्वंद्वयुद्धेआहेत, लढाया आहेत, किल्ले व त्या भोवतालचे खंदक व त्यावर टाकायचे पूल आहेत. उत्तरार्धातील त्रेपन्नाव्या प्रकरणात कृष्णकारस्थान व राजवाड्यात झालेल्या कत्तलीचे म्हणजे नरसंहाराचे वर्णन आहे. या कादंबरीतील पात्रे मोजल्यास शंभर पर्यंत जातील. शेखर, चुडामणी, जांधिलमामा, मथुरा, प्रियंवदा, देवशर्मा ही त्यातील प्रमुख पात्रेआहेत. यात पलायनेआहेत त्याचप्रमाणे राजकीय कैद सुद्धा आहे. कत्तलीचे वर्णन ही अंगावर शहारे आणणारे आहे. ही कहाणी मुख्यतः शेखर व चुडामणी हे बंधू असलेल्या आहे. यामध्ये बंधुद्वेष कोणी केला व खोटे कोण बोलले हे समजून घेण्यासाठी तुम्हाला चोविसावे प्रकरण वाचावे लागेल. कथानकाबरोबर एक जुनी दंतकथाही येथे सविस्तर सांगितली आहे. वाचताना श्वास रोखून ठेवायला लावणारी ही चित्तथरारक कादंबरी तुम्ही वाचल्यास तुमच्या स्मरणातून दीर्घकाळ जाणार नाही.

View full details