Skip to product information
1 of 1

Bahirji Sanch ( 4 books) | Special Offer - 2 Historical books Free ( बहिर्जी संचावर ८५० रु किमतीचे २ ऐतिहासिक ग्रंथ भेट ! )

Bahirji Sanch ( 4 books) | Special Offer - 2 Historical books Free ( बहिर्जी संचावर ८५० रु किमतीचे २ ऐतिहासिक ग्रंथ भेट ! )

Regular price Rs. 1,846.00
Regular price Rs. 2,696.00 Sale price Rs. 1,846.00
32% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Bahirji Sanch (Khand 1 to 4) By Prem Dhande Buy This Combo Set And Get 2 Historical books free- 
1) Suratechi Loot Ki Swarajyachi Bharapai ? By Girish Takale ( सुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई ?) = 500 /- 
2) Mahapurushanchya Najretun Shivray By Vaibhav Salunke(महापुरुषांच्या नजरेतून शिवराय )= 350/-

बहिर्जी खंड ( १ ते ४ ) गाजलेल्या कादंबरी = लेखक - प्रेम धांडे -
स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या कर्तृत्वाची गाथा - 
सह्याद्रीला अभिमान होता त्या पराक्रमी राजाचा, आणि त्या राजाला अभिमान होता त्याच्या शूर योद्ध्यांचा. ज्यांना ना इतिहासात जागा असणार होती ना त्यांच्या शौर्याचे कुठे कौतुक होणार होते, प्रत्येक क्षण ते स्वराज्यासाठी जगले, आपल्या परिवाराचा त्याग करून त्यांनी स्वराज्यालाच आपला परिवार मानले. ते महाबलशाली होते , ते महाचाणक्ष होते, शत्रूच्या गोटात राहून ते स्वराज्यासाठी लढले, त्यांच्या श्वासात आणि ध्यासात फक्त स्वराज्य होते. जसे ते आपले कर्तव्य गुप्तपणे बजावत राहिले तसेच स्वराज्याच्या इतिहासात देखील ते अदृश्यच राहिले. साडेतीनशे वर्षांनंतर आज ते वीर प्रकाश झोतात येत आहेत. त्या नायकांच्या, त्या योद्ध्यांच्या, त्या गुप्तहेरांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे लेखक प्रेम धांडे लिखित "शिवनेत्र बहिर्जी" ही कादंबरी.* गेल्या तीन वर्षांपासून बेस्टसेलर चा 'किताब बाळगून असलेली ही कादंबरी प्रत्येक शिवप्रेमीला शिवकाळाची सैर घडवून आणते. 
__________________________________________________________
Free Books- 1) सुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई | गिरीश टकले 

सुरत हे मुघल साम्राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र होते. त्यातही तेथील मुलकी व लष्करी प्रशासन स्वतः मुघल बादशहाच्या नियंत्रणाखाली होते. त्यामुळे सुरतेवरील हल्ल्याचा फटका केवळ आर्थिक नव्हे तर एकूण मुघल साम्राज्याच्या प्रतिष्ठेला शिवछत्रपतींनी दिलेला जबरदस्त धक्का होता. इंग्रज वखारीचा प्रेसिडेंट ऑक्झिडेंन १९ मार्च १६६४ च्या पत्रात म्हणतो,

"त्याचा (शिवाजी महाराजांचा) उद्देश केवळ संपत्ती मिळविणे नसून बादशाहावर सूड उगविणे हा होता."

१६६४ पर्यंतच्या महाराजांच्या मुघल बादशाही विरुद्धच्या हालचाली काही अपवाद वगळता बचावात्मक स्वरूपाच्या होत्या. पण सुरतेवरील हल्ला हा मात्र मुघल बादशहाला दिलेले उघड आव्हान होते. खंडप्राय पसरलेल्या आणि अनेक पिढ्यापासून खोलवर रुजलेल्या आशिया खंडातल्या सर्वात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या व श्रीमंत लष्करी ताकदीला आव्हान देणं सोपं कधीच नव्हतं. मराठे आणि मुघल यांच्यातलं सैनिकी संख्याबळ कागदोपत्री प्रतिकूल दिसत असतानाही सुरत लूटीचं दिव्य महाराजांनी एक नाही दोन वेळा घडवून दाखवलं, तेही अचूक लष्करी आखणीत. लष्करी डावपेच आणि राजकीय मुत्सद्दीपणा अश्या दोन्ही आघाड्यांवर महाराजांनी औरंगजेबाला दिलेला हा जबरदस्त शह होता. सुरत लूट मुघल साम्राज्याची अर्थव्यवस्था मुळापासून हादरवणारी ठरली.

2) महापुरुषांच्या नजरेतून शिवराय | लेखक - वैभव साळुंखे 
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते. - स्वामी विवेकानंद वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे. - रवींद्रनाथ टागोर शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले. - यशवंतराव चव्हाण आपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल. - सुभाषचंद्र बोस

View full details
Reviews
0.0
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
No reviews yet, lead the way and share your thoughts