Awakening Your Bliss : Atmashodhatun Parmanand Prapti By Rajendra Kher ( अवेकनिंग युवर ब्लिस )
Awakening Your Bliss : Atmashodhatun Parmanand Prapti By Rajendra Kher ( अवेकनिंग युवर ब्लिस )
आनंद म्हणजे नेमके काय, हे शोधताना कस्तुरीमृगाची गोष्ट आठवते. स्वतःच्या नाभीत दडलेल्या कस्तुरी सुगंधाच्या शोधात तो सगळीकडे सैरावैरा पळतो. पण त्याला काही केल्या त्या सुगंधाचे उगमस्थान सापडत नाही. म्हणतात ना तुझे आहे तुजपाशी, पण तू जागा चुकलासी !
सुख, समाधान, उल्हास, अशा दैहिक भावनांच्या पलीकडे गेल्याशिवाय अ-क्षय आनंदाची दिशा सापडत नाही. स्वयंशिस्त, भावनांवर नियंत्रण, ईश्वराची उपासना, आणि नामः स्मरणरूपी साधनेच्या प्रकाशात आत्मशोधाची वाट चालू लागलो की, मन व बुद्धी स्थिर होऊ लागते. आणि मग आपल्यातच दडलेला आत्मानंदाचा प्रकाश मनभर आणि नंतर आजूबाजूसही पसरू लागतो. मनुष्यजन्माला आलेल्या प्रत्येकाने जन्म ते मृत्यूपर्यंतचे जीवन विशिष्ट ध्येयाने व्यतीत करणे हितावह असल्याने आत्मानंदाप्रत पोचण्याची ही प्रक्रिया सोपी नसली तरी आवश्यक आहे. अशा वेळी भारतीय तत्त्वज्ञानातील अध्यात्मविचार साकल्याने समजून घेणे आवश्यक ठरते.
शरीरमनाचे संतुलन राखून आत्मस्वास्थ्य प्राप्त करण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू होण्यासाठी वैदिक आणि यौगिक परंपरेचा वारसा सांगणाया गुरुवर्यांचे आशीर्वादरूपी मार्गदर्शन सर्वसामान्य वाचकांसाठी उपलब्ध करून देणारा ग्रंथ - अवेकनिंग यूंवर ब्लिस