Skip to product information
1 of 6

Author Navnath Jagtap Historical (2 books)( नवनाथ जगताप लिखित ऐतिहासिक पुस्तके) - (गुप्तहेर बहिर्जी नाईक + स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज )

Author Navnath Jagtap Historical (2 books)( नवनाथ जगताप लिखित ऐतिहासिक पुस्तके) - (गुप्तहेर बहिर्जी नाईक + स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज )

Regular price Rs. 551.00
Regular price Rs. 649.00 Sale price Rs. 551.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

1) गुप्तहेर बहिर्जी नाईक| लेखक - नवनाथ जगताप, आरती जगताप

बहिर्जी नाईक यांचे संपूर्ण चरित्र एकाच पुस्तकात.
पाने - ३२० 

मी बहिर्जी नाईक
,

स्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना, मी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं, पण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, मी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या.  माझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी, माझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....

2) स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज । लेखक - नवनाथ जगताप, वैभव साळुंखे 
पाने - १६०

शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा दैदीप्यमान वारसा समर्थपणे पेलणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे शंभूराजे ! इतिहासाच्या पानांवर एकीकडे तलवारीची धार आणि दुसरीकडे लेखणीची अमोघ शक्ती घेऊन वावरलेले हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व.

'बुधभूषण' सारखा संस्कृत ग्रंथ रचणारी त्यांची प्रज्ञा, आणि रणांगणावर मोगलांच्या अवाढव्य साम्राज्याला नऊ वर्षे एकाकी झुंज देणारे त्यांचे शौर्य, हे दोन्ही एकाच नाण्यात सामावलेले होते.

हे पुस्तक केवळ एक राजाची कथा सांगत नाही, तर शिवरायांचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या शिवपुत्राची कथा सांगते. ज्याने स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण स्वाभिमान गहाण टाकला नाही.शिवरायांचे संस्कार, राज्यशास्त्रातील त्यांची गती आणि रणांगणावरील त्यांचा झंझावात यांचा साकल्याने वेध घेणारा हा एक प्रामाणिक प्रयत्न.

ज्यांच्या पराक्रमाला मृत्यूही घाबरला, अशा अजेय योद्धा आणि महाकवीची ही गाथा......

View full details