Skip to product information
1 of 16

Jivan Parivartan - Vishesh Sanch (जीवन परिवर्तन -विशेष संच)|Special Offer 50% | Limited Time Offer

Jivan Parivartan - Vishesh Sanch (जीवन परिवर्तन -विशेष संच)|Special Offer 50% | Limited Time Offer

Regular price Rs. 1,871.00
Regular price Rs. 3,742.00 Sale price Rs. 1,871.00
50% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

जीवन परिवर्तन -विशेष संच ( १५ पुस्तकांचा संच ) | Special Offer 50% | Limited Time Offer

1) तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे ! भाग १ । लेखक - नवनाथ जगताप  | पाने - ३५२

 जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ नसून, ते मानवी मनाचा अचूक ठाव घेणारे एक महान युगपुरुष आहेत. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्याला अंधारात प्रकाशाची वाट दाखवतात. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जगात शांत व समाधानी आयुष्य कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन तुकोबांच्या गाथेत आढळते. याच कालातित विचारांचे सार अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत मांडणारे पुस्तक म्हणजे 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे'.

2) तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे ! भाग २ | लेखक - नवनाथ जगताप | पाने ३००

तुकोबांच्या वाणीतील साधेपणा, विचारातील गूढता आणि जीवनाला दिशा देणारी ताकद यांचा संगम म्हणजे "तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे भाग २". या पुस्तकात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून उलगडणारी जीवनतत्त्वे, आत्मविश्वास, कर्तव्य, संयम आणि भक्ती यांचे प्रभावी मार्गदर्शन दिले आहे. प्रत्येक सूत्र हे केवळ विचार नाही, तर जगण्याची दिशा आहे. आधुनिक जीवनातील ताणतणाव, संभ्रम आणि स्पर्धेमध्ये मार्ग हरवलेल्या मनाला हे पुस्तक नवचैतन्य देईल. तुकोबांच्या शब्दांतून स्वतःला शोधण्याचा आणि अधिक समृद्ध, शांत आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.

3) शिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे । लेखक - नवनाथ जगताप  | पाने - १७६ 

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका युगाचे नायक नव्हते; तर ते तेज, शौर्य आणि नीतीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शून्यातून स्वराज्य उभारणाऱ्या या युगपुरुषाचे व्यवस्थापन कौशल्य आणि दूरदृष्टी आजही कालातित आहे.
'शिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक महाराजांच्या तेजस्वी चरित्रातून वेचलेले ५१ अमूल्य मंत्र आहेत. या सूत्रांमध्ये प्रभावी नेतृत्व, अचूक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि निस्सीम राष्ट्रप्रेमाची गुरुकिल्ली दडलेली आहे.

4) कबीरवाणी: ५१ प्रेरणादायी जीवनसुत्रे । लेखक - नवनाथ जगताप / आरती साठे  | पाने - २२४ 

कबीरवाणी: ५१ प्रेरणादायी जीवनसुत्रे' हे पुस्तक संत कबीरांच्या कालातीत विचारांचा आधुनिक संदर्भात घेतलेला एक मौलिक वेध आहे. मध्ययुगीन काळातील कबीरांचे दोहे आजही मानवी जीवनातील क्लिष्ट प्रश्नांची उत्तरे देण्यास समर्थ आहेत. या पुस्तकात कबीरांच्या निवडक ५१ दोह्यांचे अत्यंत सोप्या, प्रवाही आणि प्रमाण मराठी भाषेत विवेचन करण्यात आले आहे.

5)  रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे !! | लेखक :  नवनाथ जगताप , आरती साठे | पाने २२४ |

रामायण हे केवळ एक महाकाव्य नाही, तर मानवाच्या आदर्श जीवनाचे शाश्वत तत्त्वज्ञान आहे. "रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे" या पुस्तकात प्रभू श्रीरामांच्या मर्यादा, सीतेची पावित्र्यपूर्ण शक्ती, हनुमानाची निष्ठा आणि लक्ष्मणाची समर्पित वृत्ती यांतून जीवनाचे गूढ उलगडले आहे. प्रत्येक सूत्र हे केवळ विचार नसून, संकटात स्थैर्य देणारी आणि यशाच्या मार्गावर नेणारी दिशा आहे. साध्या पण प्रभावी भाषेत मांडलेले हे जीवनसूत्र वाचकाच्या मनाला स्पर्श करून त्याच्या विचारांना परिपक्वता आणि जीवनाला एक उच्च मूल्यांची दिशा देतात.

6) महाभारतातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे!! | लेखक : नवनाथ जगतापआरती साठे  |  पाने : २४८

महाभारत हा केवळ युद्धाचा ग्रंथ नाही, तर जीवनाचे गूढ उलगडणारा मार्गदर्शक आहे. "महाभारतातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे" या पुस्तकात श्रीकृष्ण, अर्जुन, भीष्म, विदुर यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांतून यश, निर्णयक्षमता, कर्तव्य, धैर्य आणि आत्मविश्वास यांचे मोल स्पष्ट केले आहे. प्रत्येक सूत्र आजच्या जीवनाशी जोडलेले असून, संघर्षात मार्ग दाखवणारे आणि संकटात उभारी देणारे आहे. सोप्या भाषेत मांडलेले हे विचार वाचकाला अंतर्मुख करतात आणि जीवन अधिक अर्थपूर्ण व यशस्वी करण्याची प्रेरणा देतात. हे पुस्तक तुमच्या विचारांना नवी दिशा देणारे ठरेल

7) चाणक्यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे - नवनाथ जगताप, आरती जगताप |  पाने २७९

प्राचीन काळातील महान मुत्सद्दी, रणनीतीकार आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांचे विचार हजारो वर्षांनंतरही तितकेच अचूक आणि मार्गदर्शक आहेत. 'चाणक्यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक त्यांच्या अथांग ज्ञानसागरातून निवडलेली ५१ अनमोल आणि अत्यंत प्रभावी सूत्रे तुमच्यासमोर सोप्या भाषेत मांडते.
यशस्वी नेतृत्व कसे करावे, संपत्तीचे योग्य व्यवस्थापन, संकटांचा खंबीरपणे सामना कसा करावा आणि मानवी नातेसंबंध कसे ओळखावेत, यावर हे पुस्तक व्यावहारिक मार्गदर्शन करते. केवळ सैद्धांतिक ज्ञान नव्हे, तर दैनंदिन जीवनात वापरता येतील असे सडेतोड आणि स्पष्ट विचार या पुस्तकातून मिळतात.

8) स्वामी विवेकानंदांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे - नवनाथ जगताप | आरती जगताप  -"

उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका!" या अमोघ मंत्राने अवघ्या जगाला जागृत करणारे युगपुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात, निराशा व तणावावर मात करून यशस्वी कसे व्हावे? याचे अचूक मार्गदर्शन त्यांच्या विचारांमध्ये दडलेले आहे. 'स्वामी विवेकानंद यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक म्हणजे स्वामीजींच्या अथांग विचारसागरातून वेचलेले ५१ अमूल्य मोती आहेत. आत्मविश्वास कसा वाढवावा ? संकटांचा खंबीरपणे सामना कसा करावा? मनाची एकाग्रता कशी मिळवावी? स्वतःमधील सुप्त ऊर्जा कशी ओळखावी? 


9) श्रीकृष्णनीती: प्रेरणांचा अखंड स्रोत - काल, आज आणि उद्या | लेखक - नवनाथ जगताप
पाने - १४४

कुरुक्षेत्रातील रणभूमीवर गूढ हास्य करणारा, गोकुळातील गोपालकृष्ण, आणि धर्मसंघर्षात न थकणारा नीति-सामर्थ्याचा आधार — श्रीकृष्ण!
त्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात लपलेली अमर नीती आजही मानवजातीला प्रेरणा देते.
श्रीकृष्णनीती हे पुस्तक केवळ गीतेपुरते मर्यादित न राहता, बाललीला, कंसवध, गिरीधर रूप, रुक्मिणीहरण, महाभारतातील रणनीती, शांतिदूताची भूमिका, सुदामा भेट, आणि धर्मसंस्थापनेच्या अद्भुत कार्यापर्यंतचा विस्तृत जीवनप्रवास उलगडते

10)  गनिमी कावा :अजिंक्य युद्धनितीचा गुढ मंत्र। लेखक - नवनाथ जगताप | पाने - १५२

शिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती गनिमी कावा युद्ध तंत्रात इतके माहीर आणि वाकबगार होते की स्वराज्याचे कट्टर शत्रू असलेल्या मोगली सैन्याला ते हातोहात मूर्ख बनवत.डॉ. बाळकृष्ण
थोर इतिहासकार, तथा कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरूअसामान्य योद्ध्याचे अद्ययावत गुण शिवाजी महाराजांमध्ये ठासून भरलेले होते. याबरोबरच त्यांच्यात कमालीची चपळाई होती. त्यामुळे युद्धाचा निकाल बऱ्याचदा त्यांच्या बाजूने होई. एका टोकाशी युद्ध जिंकल्यानंतर क्षणार्धात ते दुसऱ्या आघाडीवर दिसत, तिकडे हाहाकार माजवून तिकडली महत्त्वाची ठाणी ते झटपट काबीज करत असत.

11) शिवचरित्र एका युगपुरुषाची जीवनगाथा । लेखक - प्रशांत कुलकर्णी | पाने - १६८

'छत्रपती शिवाजी महाराज!' हे केवळ नाव नाही, ही एक अशी उर्जा आहे, जिच्या केवळ स्मरणाने आजही मराठी माणसाच्या नसानसात स्वाभिमान संचारतो. हा एक विचार आहे - स्वातंत्र्याचा, स्वधर्माचा, स्वभाषेचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा. एका अशा युगात, जेव्हा शेकडो वर्षाच्या अंधकारमय गुलामगिरीत अवघा भारत देश जखडला होता आणि परकीय सत्तेपुढे उभे राहण्याचे धाडस कोणातही नव्हते, तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत या विचाराने जन्म घेतला. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि शहाजीराजांच्या पराक्रमाचा वारसा घेऊन एका क्रांतीला सुरुवात झाली. महाराजांनी अशक्य ते शक्य केले. 

12) वेळेचे व्यवस्थापन | लेखक - नवनाथ जगताप  | पाने - १६८

आधुनिक जगात,वेळ हे सर्वात मौल्यवान साधन आहे,जे एकदा गेले की पुन्हा परत येत नाही. ‘वेळेचे व्यवस्थापन - वेळेच्या उपयोगाचे ३१ बहुमोलसिद्धांत’हे पुस्तक तुम्हाला वेळेचा योग्य वापर कसा करायचा याची स्पष्ट दिशा देते.
या पुस्तकातले ३१ सिद्धांत तुम्हाला वेळेच्या अयोग्य वापरावर नियंत्रण ठेवण्यास,कार्यक्षमता वाढवण्यास आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्यास मदत करतील.'

13) मोबाईल व्यसनमुक्ती | तुषार रंजनकर, नवनाथ जगताप | पाने - १७६ 

गेली पंधरा वर्ष करिअर कौन्सिलिंग करताना, विशेषतः कोविड-19 नंतरच्या काळात, मोबाईल व्यसनाचे प्रमाण आबालवृद्धात खूप वाढलेलं दिसतंय.
तुषार रंजनकर आणि नवनाथ जगताप या गुरु-शिष्यांच्या जोडीने "मोबाईल व्यसनमुक्ती" हे लिहिलेलं पुस्तक यामुळेच सुयोग्य वेळेला आलेलं आहे. या पुस्तकातील "स्वयंमूल्यांकन चाचणी" आणि "15 दिवसांचा कृती आराखडा" हे सर्वांनाच अत्यंत महत्त्वाचं ठरेल. डॉ. भूषण केळकर, संचालक संचालक, न्युफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्स

14)  मनाचे व्यवस्थापन । लेखक - नवनाथ जगताप  | पाने - ८० 

मन हे आपल्या अंतरंगातील एक अदृश्य भाग आहे, ज्यावर आपले सर्व निर्णय, भावना, वेदना, इच्छा, प्रतिज्ञा आणि स्वप्ने अवलंबून असतात. सकारात्मक मन ही खरोखरच देवाने दिलेली देणगी आहे, कारण आपल्या जीवनाचे व्यवस्थापन या मनरूपी अवयवावरच अवलंबून असते. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. वाढत्या स्पर्धेमुळे आपण सतत काहीतरी नवीन शिकण्याचा आणि त्यातून आर्थिक प्रगती करण्याचा मार्ग शोधत असतो. यामुळे लहान मुलांपासून ते निवृत्त व्यक्तींपर्यंत सर्वांचीच मनाची शांतता हरवली आहे. लहान मुलांना बालवाडीपासूनच इतका अभ्यास दिला जातो की ती थकून जातात. 

15)  प्रभावी वक्ता व्हा!| लेखक - नवनाथ जगताप | पाने - १९२ 
 
आत्मविश्वासाने बोला
प्रभावीपणे जिंकून घ्या! 🎤
आजच्या स्पर्धात्मक युगात वक्तृत्व हे केवळ एक कौशल्य नाहीतर यशस्वी जीवनाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. "प्रभावी वक्ता व्हा!" हे पुस्तक तुम्हाला सार्वजनिक बोलण्याचे भय दूर करून आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे संवाद साधण्याची कला शिकवेल.

View full details