Author Navnath Jagtap Book set ( 10 books) (नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शक १० पुस्तकांच्या सेट)
Author Navnath Jagtap Book set ( 10 books) (नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शक १० पुस्तकांच्या सेट)
Couldn't load pickup availability
1) समृद्ध पालकत्व | लेखक - नवनाथ जगताप,आरती जगताप - 120/-
पालकत्वाचे महत्त्व :पालकत्व हे केवळ एक जबाबदारी नसून ती एक जीवनभराची यात्रा आहे. आपल्या मुलांच्या विचारसरणी,स्वभाव आणि यशस्वी जीवनासाठीची पायाभरणी पालकत्वावर अवलंबून असते.योग्य मार्गदर्शन आणि समजूतदार पालकत्व आपल्या मुलांना एक उज्ज्वल भविष्य देऊ शकते.
2) प्रभावी वक्ता व्हा!| लेखक - नवनाथ जगताप -199/-
आत्मविश्वासाने बोला, प्रभावीपणे जिंकून घ्या! 🎤आजच्या स्पर्धात्मक युगात वक्तृत्व हे केवळ एक कौशल्य नाही, तर यशस्वी जीवनाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. "प्रभावी वक्ता व्हा!" हे पुस्तक तुम्हाला सार्वजनिक बोलण्याचे भय दूर करून आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे संवाद साधण्याची कला शिकवेल.
3) वेळेचे व्यवस्थापन | लेखक - नवनाथ जगताप -250/-
आधुनिक जगात,वेळ हे सर्वात मौल्यवान साधन आहे,जे एकदा गेले की पुन्हा परत येत नाही. ‘वेळेचे व्यवस्थापन - वेळेच्या उपयोगाचे ३१ बहुमोलसिद्धांत’हे पुस्तक तुम्हाला वेळेचा योग्य वापर कसा करायचा याची स्पष्ट दिशा देते.
या पुस्तकातले ३१ सिद्धांत तुम्हाला वेळेच्या अयोग्य वापरावर नियंत्रण ठेवण्यास,कार्यक्षमता वाढवण्यास आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्यास मदत करतील.
4)मनाचे व्यवस्थापन | लेखक - नवनाथ जगताप -120/-
मनाचे व्यवस्थापन हे पुस्तक मानसिक स्थिरता, आत्मविश्वास, सकारात्मकता आणि तणावमुक्त जीवन यांचा समतोल राखण्याचा मार्ग दाखवते. आपल्या विचारसरणीवर नियंत्रण मिळवून, मनाच्या पूर्ण क्षमतेचा योग्य वापर केल्यास जीवन अधिक यशस्वी, आनंदी आणि समाधानी होऊ शकते.
मन हीच सर्वात मोठी शक्ती आहे! योग्य दृष्टीकोन, सकारात्मक सवयी, आणि मनाचे शास्त्र समजून घेतल्यास स्वतःला अधिक उन्नत, आत्मविश्वासपूर्ण आणि शांत ठेवता येते. हे पुस्तक भावनिक स्थिरता, मनाच्या शुद्धतेचे तत्त्व, विचारांवर नियंत्रण, आत्मप्रेम, तसेच यशस्वी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी आवश्यक तंत्रे शिकवते
5)मोबाईल व्यसनमुक्ती | तुषार रंजनकर, नवनाथ जगताप- 250/-
गेली पंधरा वर्ष करिअर कौन्सिलिंग करताना, विशेषतः कोविड-19 नंतरच्या काळात, मोबाईल व्यसनाचे प्रमाण आबालवृद्धात खूप वाढलेलं दिसतंय.
तुषार रंजनकर आणि नवनाथ जगताप या गुरु-शिष्यांच्या जोडीने "मोबाईल व्यसनमुक्ती" हे लिहिलेलं पुस्तक यामुळेच सुयोग्य वेळेला आलेलं आहे. या पुस्तकातील "स्वयंमूल्यांकन चाचणी" आणि "15 दिवसांचा कृती आराखडा" हे सर्वांनाच अत्यंत महत्त्वाचं ठरेल.
डॉ. भूषण केळकर, संचालक संचालक, न्युफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्स
6)गुप्तहेर बहिर्जी नाईक| लेखक - नवनाथ जगताप, आरती जगताप-399/-
मी बहिर्जी नाईक,
स्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना, मी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं, पण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, मी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या. माझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी, माझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....
7)श्रीकृष्णनीती: प्रेरणांचा अखंड स्रोत - काल, आज आणि उद्या | लेखक - नवनाथ जगताप-199/-
कुरुक्षेत्रातील रणभूमीवर गूढ हास्य करणारा, गोकुळातील गोपालकृष्ण, आणि धर्मसंघर्षात न थकणारा नीति-सामर्थ्याचा आधार — श्रीकृष्ण!
त्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात लपलेली अमर नीती आजही मानवजातीला प्रेरणा देते.
श्रीकृष्णनीती हे पुस्तक केवळ गीतेपुरते मर्यादित न राहता, बाललीला, कंसवध, गिरीधर रूप, रुक्मिणीहरण, महाभारतातील रणनीती, शांतिदूताची भूमिका, सुदामा भेट, आणि धर्मसंस्थापनेच्या अद्भुत कार्यापर्यंतचा विस्तृत जीवनप्रवास उलगडते.
कधी बाळ कृष्ण, कधी रणनायक, कधी मुत्सद्दी — या भूमिकांतून धैर्य, चातुर्य, योग्य निर्णय, संकटप्रतिकार आणि मूल्यनिष्ठा शिकवणारा श्रीकृष्ण आपल्या जीवनातही निर्णायक बनण्याची प्रेरणा देतो.
आजच वाचा कृष्णनीती हे पुस्तक आणि श्रीकृष्णासारखे धैर्यवान, बुद्धिमान व नीतिमान व्हा!
8)स्वराज्याचा छावा: छत्रपती संभाजी महाराज । लेखक - नवनाथ जगताप, वैभव साळुंखे -250/-
शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा दैदीप्यमान वारसा समर्थपणे पेलणारे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे शंभूराजे ! इतिहासाच्या पानांवर एकीकडे तलवारीची धार आणि दुसरीकडे लेखणीची अमोघ शक्ती घेऊन वावरलेले हे अद्वितीय व्यक्तिमत्त्व.
'बुधभूषण' सारखा संस्कृत ग्रंथ रचणारी त्यांची प्रज्ञा, आणि रणांगणावर मोगलांच्या अवाढव्य साम्राज्याला नऊ वर्षे एकाकी झुंज देणारे त्यांचे शौर्य, हे दोन्ही एकाच नाण्यात सामावलेले होते.
हे पुस्तक केवळ एक राजाची कथा सांगत नाही, तर शिवरायांचा वारसा समर्थपणे पेलणाऱ्या शिवपुत्राची कथा सांगते. ज्याने स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण स्वाभिमान गहाण टाकला नाही.शिवरायांचे संस्कार, राज्यशास्त्रातील त्यांची गती आणि रणांगणावरील त्यांचा झंझावात यांचा साकल्याने वेध घेणारा हा एक प्रामाणिक प्रयत्न.
ज्यांच्या पराक्रमाला मृत्यूही घाबरला, अशा अजेय योद्धा आणि महाकवीची ही गाथा......
9)तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे । लेखक - नवनाथ जगताप
पाने - ३५२
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ नसून, ते मानवी मनाचा अचूक ठाव घेणारे एक महान युगपुरुष आहेत. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्याला अंधारात प्रकाशाची वाट दाखवतात. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जगात शांत व समाधानी आयुष्य कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन तुकोबांच्या गाथेत आढळते. याच कालातित विचारांचे सार अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत मांडणारे पुस्तक म्हणजे 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे'.
हे पुस्तक म्हणजे केवळ अभंगांचे संकलन नसून, ती आनंदी आणि यशस्वी जीवनाची एक गुरुकिल्ली आहे. कठीण प्रसंगात खचून न जाता हिंमतीने कसे उभे राहावे?, माणसांची पारख कशी करावी?, नातेसंबंध कसे जपावेत? आणि व्यवहारात सत्य व नीतिमत्ता कशी ठेवावी? हे या ५१ सूत्रांमधून उलगडते. तुकाराम महाराजांचे रोखठोक आणि वास्तववादी विचार आजच्या आधुनिक जीवनशैलीशी जोडून वाचकांना सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक केवळ वारकरी किंवा भक्तांसाठी नाही, तर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि गृहिणी अशा प्रत्येकासाठी आहे. नैराश्य दूर करून मनात आत्मविश्वासाचा आणि चैतन्याचा दिवा लावणारे, जगण्याची नवी उमेद देणारे हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे.
10)गनिमी कावा :अजिंक्य युद्धनितीचा गुढ मंत्र। लेखक - नवनाथ जगताप
पाने - १५२
शिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती गनिमी कावा युद्ध तंत्रात इतके माहीर आणि वाकबगार होते की स्वराज्याचे कट्टर शत्रू असलेल्या मोगली सैन्याला ते हातोहात मूर्ख बनवत.
डॉ. बाळकृष्ण
थोर इतिहासकार, तथा कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू
असामान्य योद्ध्याचे अद्ययावत गुण शिवाजी महाराजांमध्ये ठासून भरलेले होते. याबरोबरच त्यांच्यात कमालीची चपळाई होती. त्यामुळे युद्धाचा निकाल बऱ्याचदा त्यांच्या बाजूने होई. एका टोकाशी युद्ध जिंकल्यानंतर क्षणार्धात ते दुसऱ्या आघाडीवर दिसत, तिकडे हाहाकार माजवून तिकडली महत्त्वाची ठाणी ते झटपट काबीज करत असत.
अंबे कॅरे
एक प्रसिद्ध समकालीन इंग्रज वकील
Share
