Skip to product information
1 of 1

Author Navnath Jagtap 4 Book set ( जीवन बदल घडवण्यासाठी उपयुक्त अशी ४ पुस्तके )

Author Navnath Jagtap 4 Book set ( जीवन बदल घडवण्यासाठी उपयुक्त अशी ४ पुस्तके )

Regular price Rs. 738.00
Regular price Rs. 868.00 Sale price Rs. 738.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

1) वेळेचे व्यवस्थापन | लेखक - नवनाथ जगताप |  पाने - १६८ |250/-
आधुनिक जगात,वेळ हे सर्वात मौल्यवान साधन आहे,जे एकदा गेले की पुन्हा परत येत नाही. ‘वेळेचे व्यवस्थापन - वेळेच्या उपयोगाचे ३१ बहुमोलसिद्धांत’हे पुस्तक तुम्हाला वेळेचा योग्य वापर कसा करायचा याची स्पष्ट दिशा देते.
या पुस्तकातले ३१ सिद्धांत तुम्हाला वेळेच्या अयोग्य वापरावर नियंत्रण ठेवण्यास,कार्यक्षमता वाढवण्यास आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्यास मदत करतील.

2)श्रीकृष्णनीती: प्रेरणांचा अखंड स्रोत - काल, आज आणि उद्या | लेखक - नवनाथ जगताप | पाने - १४४| 199/-

कुरुक्षेत्रातील रणभूमीवर गूढ हास्य करणारा, गोकुळातील गोपालकृष्ण, आणि धर्मसंघर्षात न थकणारा नीति-सामर्थ्याचा आधार — श्रीकृष्ण!
त्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात लपलेली अमर नीती आजही मानवजातीला प्रेरणा देते.
श्रीकृष्णनीती हे पुस्तक केवळ गीतेपुरते मर्यादित न राहता, बाललीला, कंसवध, गिरीधर रूप, रुक्मिणीहरण, महाभारतातील रणनीती, शांतिदूताची भूमिका, सुदामा भेट, आणि धर्मसंस्थापनेच्या अद्भुत कार्यापर्यंतचा विस्तृत जीवनप्रवास उलगडते.
कधी बाळ कृष्ण, कधी रणनायक, कधी मुत्सद्दी — या भूमिकांतून धैर्य, चातुर्य, योग्य निर्णय, संकटप्रतिकार आणि मूल्यनिष्ठा शिकवणारा श्रीकृष्ण आपल्या जीवनातही निर्णायक बनण्याची प्रेरणा देतो.

आजच वाचा कृष्णनीती हे पुस्तक आणि श्रीकृष्णासारखे धैर्यवान, बुद्धिमान व नीतिमान व्हा!

3)तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे । लेखक - नवनाथ जगताप 
पाने - ३५२ | 299/-

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ नसून, ते मानवी मनाचा अचूक ठाव घेणारे एक महान युगपुरुष आहेत. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्याला अंधारात प्रकाशाची वाट दाखवतात. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जगात शांत व समाधानी आयुष्य कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन तुकोबांच्या गाथेत आढळते. याच कालातित विचारांचे सार अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत मांडणारे पुस्तक म्हणजे 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे'.

हे पुस्तक म्हणजे केवळ अभंगांचे संकलन नसून, ती आनंदी आणि यशस्वी जीवनाची एक गुरुकिल्ली आहे. कठीण प्रसंगात खचून न जाता हिंमतीने कसे उभे राहावे?, माणसांची पारख कशी करावी?, नातेसंबंध कसे जपावेत? आणि व्यवहारात सत्य व नीतिमत्ता कशी ठेवावी? हे या ५१ सूत्रांमधून उलगडते. तुकाराम महाराजांचे रोखठोक आणि वास्तववादी विचार आजच्या आधुनिक जीवनशैलीशी जोडून वाचकांना सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक केवळ वारकरी किंवा भक्तांसाठी नाही, तर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि गृहिणी अशा प्रत्येकासाठी आहे. नैराश्य दूर करून मनात आत्मविश्वासाचा आणि चैतन्याचा दिवा लावणारे, जगण्याची नवी उमेद देणारे हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे.

4)मनाचे व्यवस्थापन | लेखक - नवनाथ जगताप| पाने - ८० | 120/-

मनाचे व्यवस्थापन हे पुस्तक मानसिक स्थिरता, आत्मविश्वास, सकारात्मकता आणि तणावमुक्त जीवन यांचा समतोल राखण्याचा मार्ग दाखवते. आपल्या विचारसरणीवर नियंत्रण मिळवून, मनाच्या पूर्ण क्षमतेचा योग्य वापर केल्यास जीवन अधिक यशस्वी, आनंदी आणि समाधानी होऊ शकते.

मन हीच सर्वात मोठी शक्ती आहे! योग्य दृष्टीकोन, सकारात्मक सवयी, आणि मनाचे शास्त्र समजून घेतल्यास स्वतःला अधिक उन्नत, आत्मविश्वासपूर्ण आणि शांत ठेवता येते. हे पुस्तक भावनिक स्थिरता, मनाच्या शुद्धतेचे तत्त्व, विचारांवर नियंत्रण, आत्मप्रेम, तसेच यशस्वी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी आवश्यक तंत्रे शिकवते

View full details