Ashwathama By Gunjan Porval, Vijay Tarvade(Translator) (अश्वत्थामा)
Ashwathama By Gunjan Porval, Vijay Tarvade(Translator) (अश्वत्थामा)
Couldn't load pickup availability
अश्वत्थामा : शापित योद्धयाची ऋणमुक्ती
महाभारताच्या महासंग्रामानंतर १०० वर्ष लोटली आहेत… आणि पूर्वी नामशेष झालेल्या एका प्राचीन शक्तीकडून असुरांचे भयावह युग स्थापन होतं व त्यामुळे मानवाच्या नव्या संस्कृतीला धोका निर्माण होतो. या शक्तीपुढे एकच अडथळा आहे, तो म्हणजे गुरुदेव द्रोणाचार्याचा पुत्र, महान योद्धा अश्वत्थामा. मात्र श्रीकृष्णाच्या शापामुळे अश्वत्थाम्याने आपल्या सर्व दिव्य शक्ती गमावल्या आहेत. आणि अशा अवस्थेत तो प्रभू रामाचे कोदंड शोधण्याच्या मोहिमेत नकळतपणे ओढला जातो.
भूतकाळातील आठवणींची पिशाचे त्याला छळत आहेत. मित्र आणि शत्रू यांतली सीमारेषा धूसर झालेली भासत असते. काही झालं तरी त्याला विजयी होणं क्रमप्राप्त असतं… आणि त्यासाठी अंतरात्म्यातील सैतानावर मात करणं भाग असतं. त्यासाठी तो दीर्घ प्रवासाला निघतो. गंगेच्या खोऱ्यापासून हिमावंताची बर्फाच्छादित शिखरं अशी प्रचंड भ्रमंती करतो… इथले अपयश मृत्यूपेक्षा भीषण आहे. आणि अश्वत्थामा तर मृत्यूच्या वरदानापासून वंचित आहे.
ही सारी लीला भगवान श्रीकृष्णाचीच आहे का? अश्वत्थामा आपला गमावलेला लौकिक पुनश्च प्राप्त करू शकेल का? अशी कुतूहलं निर्माण करून ते शमवणारी कादंबरी… अश्वत्थामा: शापित योद्ध्याची ऋणमुक्ती !
Share
