Ase Hote Gandhiji By Suhas Kulkarni (असे होते गांधीजी)
Ase Hote Gandhiji By Suhas Kulkarni (असे होते गांधीजी)
Couldn't load pickup availability
महात्मा गांधींना आपण ‘राष्ट्रपिता' म्हणतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. पण त्यांचं मोठेपण तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. तोपर्यंतच्या जगभरातल्या स्वातंत्र्य चळवळी या प्रामुख्याने क्रांतिकारकांनी सत्ताधाऱ्यांविरुद्ध पुकारलेली सशस्त्र युद्धं असत. पण गांधीजींनी पूर्ण वेगळा मार्ग शोधून काढला. त्यांनी देशभरातल्या साध्यासुध्या माणसांच्या मनात स्वातंत्र्याची आस जागवली. त्यांच्या हातांत सत्याग्रहासारखं अहिंसात्मक शस्त्र दिलं. केवळ स्वातंत्र्य नव्हे, तर देशबांधवांनी एकोप्याने राहून सुराज्य स्थापन करण्याचं स्वप्न मनामनात रुजवलं. गांधीजींनी दाखवलेला हा मार्ग केवळ भारताच्या नव्हे, तर पुढे जगभरातल्या अनेक स्वातंत्र्य चळवळींची प्रेरणा ठरला. हे सारं गांधीजींनी कसं घडवून आणलं ? हे अद्भुत घडवणारे गांधीजी होते तरी कसे?
Share
