Ase Ghadava Mulanche Vyaktimatva By Dr.Rama Marathe
Ase Ghadava Mulanche Vyaktimatva By Dr.Rama Marathe
Couldn't load pickup availability
असे घडवा मुराचे व्यक्तिमत्व मनुष्य हा एकच प्राणी असा आहे ज्याला जीवनातल्या काही सहज प्रक्रियासुद्धा मुद्दाम शिकून घ्याव्या लागतात, संस्कारित कराव्या लागतात... माणसांची बौद्धिक आणि भावनिक क्षितिजं रुंदावत असल्यानं असेल कदाचित. आजच्या धकाधकीच्या जीवनात तर याची गरज फार जाणवते आहे. दैनंदिन रहाटगाडग्याला बांधलेल्या अन् छोट्या-छोट्या कुटुंबात राहणाऱ्या आजच्या माता-पित्यांना आपली मुलं अपेक्षेप्रमाणं वाढवणं सुकर राहिलेलं नाही. वाढती स्पर्धा, मानसिक ताणतणाव, होमवर्कचा दबाव, अपुरा खेळ, टीव्हीचं आक्रमण, खचणारा सांस्कृतिक पाया अशा सर्व अडथळ्यांतून मुलांचं व्यक्तिमत्त्व कसं जोपासावं अन् पालकत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार कशी पाडावी याचा साध्या, सोप्या, अकृत्रिम भाषेत मूलमंत्र देणारे हे पुस्तक पालकांना निश्चितच उपयोगी पडेल. भरभक्कम मानसशास्त्रीय बैठक अन् मुलं व पालक दोघांशीही संवाद साधण्याचा लेखिकेचा दैनंदिन अनुभव यावर आधारित हे पुस्तक संग्रही ठेवावं व मुलांशी वागताना वारंवार वाचावं असं आहे. या आवृत्तीत अधिक काय वाचाल ? तणाव हटाव मोहीम आपली मुलं - जबाबदारी की गुंतवणूक ? मुलांचा भावनिक-सामाजिक बुद्ध्यांक वाढवा प्रकाशवाटा - मुलांची बौद्धिक कुंडली जाणून घ्या.
Share
