Skip to product information
1 of 4

Arthshastra - Bestsellers - Books ( 4 Combo set)

Arthshastra - Bestsellers - Books ( 4 Combo set)

Regular price Rs. 1,232.00
Regular price Rs. 1,499.00 Sale price Rs. 1,232.00
18% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

The Disciplined Trader - द डिसीप्लिन्ड ट्रेडरद डिसिप्लिन्ड ट्रेडर’ मुळे ट्रेडरना बाजारातील वेगवेगळ्या परिस्थितींना आणि संधींना उचित व आपल्याला लाभदायक ठरणारा प्रतिसाद देण्याच्या महत्त्वाच्या विचारप्रक्रिया आणि कृती शिकण्यास मदत होते. अनुभवी ब्रोकर, फ्युचर्स ट्रेडर आणि ट्रेडिंग प्रशिक्षक मार्क डग्लस यांनी त्यांच्या सुरुवातीच्या ट्रेडिंगविषयक अनुभवांबर सखोल विचार केला. त्यानंतर बहुतेक ट्रेडरना ज्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं ती आव्हानं त्यांनी शोधून काढली आणि त्यांना तोंड दिलं. यालाच ते आपल्या स्वतःविषयीची ‘जाणीव जबरदस्तीनं करून घेणं’ भाग पडणं असं म्हणतात.

ट्रेडिंगमधून संपत्ती गोळा करण्यासाठी आणि ती तशीच टिकवून ठेवण्यासाठी अद्वितीय मानसिक कौशल्यांची गरज असते, तर ही कौशल्यं शिकण्यासाठी आणि त्यांना मनावर बिंबवण्यासाठी संघटित आणि पद्धतशीर दृष्टिकोन आवश्यक असतो. या दृष्टिकोनातून यशाची मनोरचना तयार करता येते. ‘द डिसिप्लिन्ड ट्रेडर’ हे पुस्तक ही मनोरचना तयार करण्यास आणि तिच्या साहाय्यानं कोणत्याही ट्रेडरच्या मनातील पैसा गमावण्याच्या, पराभूत होण्याच्या भीतीचं जिंकण्याच्या प्रवृत्तीत रूपांतर करण्यास मदत करत

‘अर्थसाक्षर व्हा!’

आपण कमवलेले पैसे कुठे जातात हे समजत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करून समाधानी आयुष्य जगायचे असेल, तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे.

तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येये कशी साध्य करावी, विमा व कर्ज व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे यांचे उत्तम मार्गदर्शन ‘अर्थसाक्षर व्हा!’ मध्ये वाचायला मिळते.

Paishache Manasshastra - पैशाचे मानसशास्त्र
पैशाचा योग्य वापर हा तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा सबंधित नसतो तो तुम्ही कसे वागता याच्याशी जास्त सबधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यत अवघड असते. विशेषतः हुशार लोकाना। पैशाचे नियोजन, त्याची गुंतवणूक, आणि धद्यातील निर्णय या गोष्टींमध्ये गणित आणि आकडेमोड आवश्यक असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. यात अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग काय
निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते, पण व्यवहारात लोक स्प्रेडशीटवर निर्णय घेत नाहीत. ते जेवताना, बैठक चालू असताना निर्णय घेतात… जेथे तुमचा भूतकाळ, तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा अहकार,
 अभिमान, खरेदी-विक्री अशा अनेक बाबी त्या निर्णयात अप्रत्यक्षपणे भाग घेत असतात. पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकात लोक पैशाबद्दल किती अनोख्या पद्धतीने विचार करतात या विषयी लेखक १९ गोष्टी सांगत आहेत, शिवाय आयुष्यातील महत्त्वाच्या विषयांपैकी एक अशा ‘पैसा’ या विषयावर महत्त्वाचे धडे देत आहेत.

 Bikat Paristhitisathi Uttam Arthashastra -
बिकट परिस्थितीसाठी उत्तम अर्थशास्त्रया क्रांतिकारी पुस्तकात अभिजीत बॅनर्जी आणि एस्थर डफ्लो या एमआयटी संस्थेतील मान्यवर अर्थतज्ज्ञांनी हे आव्हान पत्करले आहे. जगभरात अर्थशाखात झालेल्या अद्ययावत संशोधनाच्या आधारावर त्यांनी त्यांचे विचार रसाळ भाषेत मांडले आहेत. हे विचार मूलगामी, जिज्ञासा वाढवणारे आणि प्रश्नांची निकड स्पष्ट करणारे आहेत. बिकट परिस्थितीसाठी उत्तम अर्थशाख या पुस्तकात त्यांनी परस्पर सामंजस्य व आदर यांवर उभारलेली समाजव्यवस्था घडविण्यासाठी अर्थव्यवस्थेत हुशारीने कोणत्या प्रकारचे हस्तक्षेप करणे गरजेचे आहे हे मांडले आहे. ज्या जगात आपण जगत आहोत ते किती अनिश्चिततेवर उभारलेले आहे याची जाणीव आपल्याला हे असामान्य पुस्तक करून देते.

 

View full details